पुणे

असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार निवृत्तीवेतन; सहकार खात्याचा सोसायट्यांना 'हा'आदेश

अवधूत कुलकर्णी

पिंपरी - असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे, म्हणून केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने अशा कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शहरातील सोसायट्यांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार सोसायट्यांकडून त्यांच्या सोसायट्यांमध्ये स्वयंपाक, स्वच्छता, सुरक्षारक्षक इ. कामे करणाऱ्यांची नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. 

गेल्या वर्षभरात राज्यात अशा पाच लाख 81 हजार 911 कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. 

असंघटित कामगारांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर निवृत्तीवेतन मिळावे, म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 1 फेब्रुवारी 2019 ला जाहिर केली. या योजनेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या योजनेतअंतर्गत भूमिहिन मजूर, शेतमजूर, फेरीविक्रेते अशांची नोंदणी करण्यात येते. वयाची 18 ते 40 वयोगटातील आणि ज्यांचे उत्पन्न महिन्याला 15 हजार रुपयांपर्यंत आहे, असे कामगार या योजनेत सहभागी होऊ शकतात. कामगारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला श्रमयोगी कार्डाचे वाटप केले जाते. त्यानंतर बॅंकेत खाते सुरु झाल्यावर लाभार्थ्याचे खाते सुरु होते. 

या योजनेत सहभागी व्हावे आणि योजनेचा जास्तीतजास्त कामगारांना लाभ व्हावा यासाठी राज्याच्या सहकार खात्याने सोसायट्यांना योजनेचा प्रसार करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार ही नोंदणी सुरु आहे. या नोंदणीची लिंक केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सोसायट्यांना पाठविली आहे. त्याद्वारे गुगल शिटवर लाभार्थ्याची माहिती भरावयाची आहे. त्यानुसार सोसायट्यांकडून या कामाला सुरवात झाली आहे. 18 एप्रिलपर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. या अर्जावर कामगाराचे नाव, तो कोणत्या सोसायटीत काम करतो, सोसायटीतील घरांची संख्या, आधारकार्ड क्रमांक इ. माहिती भरावयाची आहे. 

उत्पन्न 25 हजारांहून अधिक 
शहरात मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. काहींचे मासिक उत्पन्न 25 हजार रुपयेही आहे. मात्र बहुतेकजण मालकांकडून रोख स्वरुपात वेतन घेतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न 15 हजार रुपये आहे हे नेमके कसे ठरविणार असा प्रश्‍न असल्याचा मुद्दा एका सोसायटीधारकाने उपस्थित केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT