पुणे

आंबेगाव : तांबडेमळा येथे 200 बेडचे अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय होणार

डी. के. वळसे पाटील

मंचर : येथे कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० बेडचे नियोजित हॉस्पिटल तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे गायरान १४ एकर जमिनीत होणार आहे. आवश्यक असलेल्या जागेची पाहणी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बप्पा बहिर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंबादास देवमाने भूमापन अधिकारी अंबादास गांगुर्डे ,मंडलाधिकारी दीपक मडके, उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्याची व मंचर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मंचर उपजिल्हा रुग्णालयात अजून २०० बेड सुविधेची गरज असल्याबाबतचा प्रस्ताव वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार मंचर उपजिल्हा रुग्णालयाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार आरोग्य विभाग व शासनाचे पथक उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आले होते. पण सध्या असलेली जागा अपुरी पडत असल्याने नवीन जागा असल्यास प्रस्ताव पाठवावा. असे सूचित केले होते. त्यानुसार महसूल खात्याने जागेचा शोध घेऊन तांबडेमळा येथील जागा योग्य असल्याचे स्थानिक आरोग्य विभागाने नमूद केले आहे. वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष जागेची व भूमी अभिलेख खात्याच्या नकाश्याची पाहणी प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर केली.

तांबडेमळा येथील गोरक्षनाथ टेकडी शेजारी असलेली जागा योग्य आहे.पुणे-नाशिक व नव्याने होणाऱ्या खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या मध्यभागी ही जागा आहे. रुग्णांना ये-जा करण्यासाठी ही जागा उपयुक्त व सोयीचे आहे.भविष्यात अजूनही उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार करणे सोयीचे होईल. महसूल व आरोग्य विभागाने ताबडतोब जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्य शासनाकडे पाठवावा. -दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री 

मंचर उपजिल्हा रुग्णालय नजीकच्या काळात महिलां हॉस्पिटल होणार.तांबडेमळा येथे अतिदक्षता,अपघात,नेत्र स्वतंत्र विभाग.सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार. १२ वरिष्ठ तज्ञ डॉक्टर कार्यरत राहणार आहेत. -डॉ अंबादास देवमाने,वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मंचर

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT