Using E SIM can be fraud with you financially 
पुणे

सावधान ! ई-सीमच्या नावाने होऊ शकते तुमची आर्थिक फसवणुक

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : बाजारात नव्याने आलेल्या ई-सीम या अद्ययावत तंत्राचा वापर करुन सायबर गुन्हेगार नागरीकांच्या मोबाईलमधील अंतर्गत माहिती चोरुन त्यांच्या बँक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम लंपास करु शकतात. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरीकांना फसवणुक टाळण्याठी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील काही दिवसांपासून मोबाईलच्या बाजारपेठेत नवीन प्रकारचे फोन आले आहेत. त्यामध्ये इ-सीमचा वापर केलेला आहे. संबंधीत इ-सीमवाले मोबाईल फोन तुमच्याकडे असतील तर त्यामध्ये आपल्या नेहमीच्या सीमकार्डची गरज नसते. नागरीक मोबाईलमध्ये इ-सीम सुरु करुन आपल्याला पाहिजे ते मोबाईल नेटवर्क आपल्याला योग्य ते शुल्क भरुन निवडता व वापरता येते, असे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सध्या मोबाईल नेटवर्कच्या त्रासामुळे नागरीक त्रस्त आहेत. त्यांच्याकडुन अशा इ-सीम असलेल्या मोबाईलचा वापर केला जात आहे. दरम्यान, नागरीकांकडुन या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी आता आपली नजर याच इ-सीम असलेल्या मोबाईलकडे वळविली आहे.

...असे केले जातात पैसे लंपास
सायबर गुन्हेगार याच इ-सीमचा गैरवापर करुन ठराविक मोबाईल कंपनीच्या ग्राहकांची आर्थिक फसवणुक करत आहेत. सायबर गुन्हेगार एका मोबाईल कंपनीचा #121 हा क्रमांक लावुन स्वत:चा ईमेल ग्राहकांच्या नावाने अद्ययावत करतात. त्यानंतर संबंधीत ग्राहकाच्या नावाने इ-सीम घेतात. क्यूआर कोडचा वापर करुन ते इ-सीम सुरु करतात. त्यानंतर संबंधीत ग्राहकाला मेसेजद्वारे लिंक प्राप्त होते. त्यावर क्लिक केल्यानंतर एक अर्ज दिसतो. त्यामध्ये संबंधीत व्यक्तिचे बँक खाते, डेबीट व क्रेडीट कार्ड, त्यांचा पीन क्रमांक अशी गोपनीय माहिती भरायला सांगितली जाते.सायबर गुन्हेगार त्यांच्या मोबाईलमध्ये संबंधीत ग्राहकाच्या नावाचा इ-सीमचा वापर करुन त्यांच्या खात्यातील पैसे ऑनलाइन माध्यमातुन स्वत:च्या खात्यावर वळवुन नागरीकांची फसवणुक करतात, असे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
- गरज नसल्यास ई-सीम वापरात आणु नका
- कोणताही ईमेल आयडी तुमचा ईमेल आयडी म्हणून देऊ नका
- सोशल मीडियावर तुमचा मोबाईल क्रमांक थेवु नका
- तुम्हाला ई-सीमबद्दल फोन आल्यास, त्याविषयी तुमच्या मोबाइल कंपनीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधुन खातरजमा करा.
- इंटरनेटद्वारे आलेल्या किंवा मेसेजद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक करु नका
- इंटरनेटवरील कोणत्याही अर्जावर तुमच्या 
बँक खाते,क्रेडिट/डेबिट कार्ड विषयीची गोपनीय माहिती देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT