Military Institute of Technology sakal
पुणे

‘मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ संस्थेच्या प्रमुखपदी व्ही राजशेखर यांची नियुक्ती

एअर व्हाइस मार्शल राजशेखर हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या गिरीनगर येथील ‘मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ संस्थेच्या प्रमुखपदी एअर व्हाइस मार्शल व्ही राजशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मेजर जनरल हरी सिंह यांच्याकडून शुक्रवारी प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला.(V Rajasekhar appointed head of Military Institute of Technology)

एअर व्हाइस मार्शल राजशेखर हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. हवाईदलातील ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हवाई मुख्यालय आणि प्रशिक्षण मुख्यालयामध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच हवाईदलाच्या तांत्रिक महाविद्यालयात प्रशिक्षक प्रमुख म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर विविध संवाद प्रकल्पांचे संचालनही त्यांनी केले आहे. त्यांनी मिराज-२००० एव्हीओनिक्स आणि सिस्टम्सच्या देखभालीशी संबंधित जबाबदारी देखील पार पाडली आहे. जयपूर येथील एएफसीईएल मोबाईल स्विचिंग सेंटरच्या प्रमुखपदावर ही ते कार्यरत होते.आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि न्यूरल नेटवर्क्सच्या क्षेत्रातील विविध शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. तसेच वेगवेगळ्या माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम परिषदांमध्ये वक्ते म्हणून सातत्याने सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, आता 'या' क्षेत्राला केले लक्ष्य; १ नोव्हेंबरपासून जगभरात होणार लागू

Nanded Love Affair : प्रेमसंबंधातून प्रेमीयुगुलानं प्राशन केलं विष; घरच्यांचा होता विरोध, असं काय घडलं? दोघांना उचलावं लागलं टोकाचं पाऊल!

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Cough Syrup Testing: कफ सिरपचे नमुने घेण्‍यास सुरुवात ‘एफडीए’ पुण्यात इतर कंपन्‍यांच्या औषधाचीही करणार तपासणी

Supreme Court : ''क्रिकेट खेळ राहिला नाही, व्यवसाय बनलाय''; सुप्रीम कोर्टाला असं म्हणण्याची वेळ का आली?

SCROLL FOR NEXT