पुणे : लसीकरण केंद्र पुन्हा गजबजली sakal
पुणे

पुणे : लसीकरण केंद्र पुन्हा गजबजली

बहुतांश पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्याला आता तीन महिने झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे शहरातील लसीकरण केंद्रांवर पुन्हा पुणेकरांची पावले वळू लागली आहेत. यापैकी बहुतांश जण हे दुसऱ्या डोससाठी येत असून, पहिला डोस घेणाऱ्यांचीही संख्या गेल्या चार दिवसांपासून वाढली असल्याचे निरीक्षण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी नोंदविले आहे.

पुण्यात एप्रिलपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यानंतर शहरातील कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा हा वेग सातत्याने वाढत होता. या दरम्यान बहुतांश पुणेकरांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला. त्याला आता तीन महिने झाले आहेत.

त्यामुळे दुसऱ्या डोस घेणारेही पुन्हा लसीकरण केंद्रांकडे वळले आहेत. त्यातही खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांऐवजी महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या लसीकरण केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी नोंदविले.

शहरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचा रुग्ण आढळल्यानंतर ही प्रतिबंध लस घेण्यासाठी आता पुन्हा केंद्रांवर गर्दी वाढत आहेत. एकट्या मालतीबाई काची प्रसुतीगृहातील (गाडीखाना) केंद्रात दोनशेच्यावर पुणेकरांनी कोविशिल्डची लस घेतली, असेही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. याबद्दल महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘शहरात गेल्या २९ नोव्हेंबरपासून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सप्टेंबरमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचा आता दुसरा डोस सुरू आहे. तसेच, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आतापर्यंत पहिला डोस न घेतलेले नागरिकही केंद्रावर येत असल्याचे दिसते आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilshad Mulla OBC Caste Certificate Invalid : 'काँग्रेस'च्या दिलशाद मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला ठरविला अवैध; नगरसेवकपद धोक्यात, मुल्ला उच्च न्यायालयात मागणार दाद

Pune News: सिंहगड संस्थेला पुन्हा दणका ;आणखी २५ महाविद्यालयांवर प्रशासकाची नेमणूक

Pune Weather: पुण्यात पुढील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढणार

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

ElNino2026: एल निनो डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीजवळ ;सर्वाधिक तापमानाची शक्यता; जूनमध्ये न्यूट्रल स्थितीचा ‘सीपीसी’चा अंदाज

SCROLL FOR NEXT