Under 18 Vaccination SAKAL
पुणे

पुणे : 18 ते 15 वयोगटातील लसीकरणात ग्रामीण भागाची आघाडी

या लसीकरणात ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहर व पिंपरी चिंचवड तुलनेने खूप मागे पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील १५ ते १८ या वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणात ग्रामीण भागाने आघाडी घेतली आहे. या लसीकरणात ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहर व पिंपरी चिंचवड तुलनेने खूप मागे पडले आहे. जिल्ह्यात आज अखेरपर्यंत (ता.१९) २ लाख ९९ हजार ९९१ मुलांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. यामध्ये ग्रामीणमधील १ लाख ९७ हजार ४९५ जणांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये एकूण पात्र मुलांच्या तुलनेत ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. (Pune District Vaccinastion Updates)

याउलट पुणे शहरातील ६१ हजार ५६१ मुलांचे लसीकरण पूर्ण झाले असून शहरातील या लसीकरणाची टक्केवारी २७ टक्के आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ४० हजार ९५५ मुलांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील या लसीकरणाचे प्रमाण ३५ टक्के इतके झाले आहे. शहर व जिल्ह्यात रोज सुमारे सरासरी १५ हजार ७४९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे.

राज्यात १६ जानेवारी २०२१ पासून प्रौढांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांनाच ही लस देण्यात आली. प्रौढांचे कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर सुमारे एक वर्षांनी उशिरा म्हणजेच ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण सुरु झाले आहे.

पुणे शहरात रोज सरासरी तीन हजार २४०, पिंपरी चिंचवडमध्ये सरासरी २ हजार ११६ तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी रोज दहा हजार ३९३ विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण केले जात आहे. १५ ते १८ या वयोगटात इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि काही प्रमाणात बारावीचे विद्यार्थी येतात. त्यामुळे ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी बुधवारी (ता.१९) सांगितले.

लसीकरणास पात्र विद्यार्थी संख्या

  • पुणे शहर २ लाख २४ हजार ५१५

  • पिंपरी चिंचवड १ लाख १६ हजार ७००

  • ग्रामीण जिल्हा २ लाख ११ हजार ९७५

  • जिल्हा एकूण ५ लाख ५३ हजार १९०

आतापर्यंत लसीकरण पूर्ण झालेली विद्यार्थी संख्या

  • पुणे शहर ६१ हजार ५६१

  • पिंपरी चिंचवड ४० हजार ९५५

  • ग्रामीण जिल्हा १ लाख ९७ हजार ४७५

  • एकूण जिल्हा २ लाख ९९ हजार ९९१

पुणे जिल्ह्याने विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणात प्रथमपासून राज्यात आघाडी घेतली आहे. योग्य नियोजन, पालक, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. लसीकरणाची हीच गती कायम राहिल्यास येत्या दोन आठवड्यात पुणे जिल्ह्यातील सर्व लसीकरण पात्र विद्यार्थ्याचा पहिला डोस पूर्ण होऊ शकणार आहे.

डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT