Vaccination Sakal
पुणे

लशीचे शुल्क सर्व ठिकाणी सारखेच आकारावे; महापालिकेची भूमिका

शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. रुग्णालयांत लशीसह चहा, पाणी, नाष्टा अशा सुविधाही दिल्या जातात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी रुग्णालयांतील (Private Hospital) लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) एका डोससाठी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत शुल्क (Fee) आकारले जात आहे. या शुल्कात समानता असावी, अशी मागणी महापालिका प्रशासन (Municipal Administrative) राज्य शासनाकडे (State Government) करणार असल्याचे आयुक्त विक्रमकुमार (Vikramkumar) यांनी सांगितले. दरम्यान, ९०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. (Vaccination Rate Same in all Places Municpal)

शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. रुग्णालयांत लशीसह चहा, पाणी, नाष्टा अशा सुविधाही दिल्या जातात. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था देखील केली जाते. या सुविधांमुळे पैसे देखील जास्त घेतले जात आहेत. मात्र, शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये लसीकरण शुल्क सारखे दर असावेत, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रम कुमार म्हणाले, ‘‘खासगी लसीकरण केंद्रांवरील शुल्क एकसमान असले पाहिजे. यासाठी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.’’

नऊशेपेक्षा जास्त रक्कम घेतल्यास कारवाई

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांनी ९०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रमाणे इतर रुग्णालयांनी दुर्बल घटकांना लसीकरणात सवलत देण्याची तयारी दाखवली पाहिजे.’

खासगी रुग्णालयांत होणाऱ्या लसीकरणामुळे शहराला मदत होत आहे. परंतु, प्रत्येक केंद्रांवर भिन्न शुल्क असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सर्व खासगी केंद्रांवर दर समान असावेत.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Health Update : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, चेन्नई दौरा रद्द; डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्ली ते मुंबई राजकीय हालचालींना वेग

'माझा जोडीदार, माझं प्रेम...' रितेश देशमुखसाठी जिनिलियाची खास पोस्ट; रोमँटिक फोटो पाहून चाहते फिदा!

Satara Soldier: २० वर्षे देशसेवा केली, पण निवृत्तीचे सुख लाभले नाही; साताऱ्याच्या जवानाची हृदयद्रावक कहाणी

Latest Marathi News Live Update : भारत आपल्या विरोधकांनाही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही – मोहन भागवत

भारताचं अनोखं गाव! ५३२ वर्षांचा इतिहास, घराघरांतून घडले IAS-IPS अधिकारी अन् सैन्यातील जवान

SCROLL FOR NEXT