पुणे

पुण्यात आज ८४ ठिकाणी होणार लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

- ७० ठिकाणी कोव्हिशिल्ड तर १४ ठिकाणी कोव्हॅक्सिन

- कोव्हिशिल्डचा ३० टक्के साठा पहिल्या डोससाठी

- बुधवारी १४,१७९ जणांचे लसीकरण

पुणे : शासनाकडून महापालिकेला बुधवारी नवीन लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शिल्लक साठा कमी असल्याने लसीकरण केंद्र कमी करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. परिणामी, उद्या (गुरुवारी) फक्त महापालिकेच्या ७० केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १४ ठिकाणी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.

उपलब्ध कोव्हिशिल्ड लसीमध्ये ७० टक्के लस ही ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी दुसऱ्या डोससाठी; तर ३० टक्के लस पहिल्या डोससाठी वापरली जाणार आहे. चार दिवसानंतर राज्य शासनाकडून पुण्याला ३० हजार लस उपलब्ध झाल्यानंतर बुधवारी ११५ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये १४ हजार १७९ जणांनाच लसीचा लाभ मिळाला आहे. गुरुवारसाठी नव्याने लस मिळाली नसल्याने उपलब्ध असलेल्या लस साठ्यावरून गुरुवारचे नियोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी ८४ केंद्रांवर लसीकरण केले जाईल. त्यामध्ये ७० केंद्र कोव्हिशिल्ड लसीचे असून, प्रत्येक केंद्रावर १०० डोस देण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर ४५ पेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी ७० टक्के लस असेल. तर ४५ पुढील ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशाच ३० टक्के लस असणार आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट घेतला नाही, अशांना पहिला डोस दिला जाणार नाही. तर १८ ते ४४ वयोगटासाठी ठरवून दिलेल्या पाच केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

ऑनलाइन नोंदणी करता येणार रात्री ८ वाजता

१८ ते ४४ वयोगटासाठी तसेच ४५ व पुढील वयोगटाच्या पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट निश्चित करणे गरजेचे आहे. मात्र, ही नोंदणी कधी दुपारी तीन वाजता, तर कधी सकाळी सहा वाजता सुरू होत होती. पण ही वेळ माहितीच नसल्याने नागरिक दिवसरात्र अपॉईंटमेंटसाठी प्रयत्न करत होते. मात्र, आता रात्री ८ वाजता ऑनलाइन नोंदणीची लिंक खुली केली जाणार आहे. बुधवारी ही लिंक ८ वाजता खुली झाली होती.

बुधवारी झालेले लसीकरण

गट पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य विभाग कर्मचारी ६१ ३६०

फ्रंट लाईन कर्मचारी ४०४ ७८०

४५ ते ५९ वयोगट - ८५९ २९५१

६० पेक्षा पुढे - ३५१ ६३३३

१८ ते ४४ वयोगट - २०८० ००००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT