पिंपरी - व्हॅलेंटाइन डे केवळ तरुण किंवा विवाहित व्यक्तीच साजरा करू शकतात असे नाही. तर कुटुंबातील इतर सदस्यांवरही आपले प्रेम असतेच की. असाच एक क्षण पिंपरी मार्केटमध्ये पाहायला मिळाला. एका आईने मुलीला गुलाब खरेदी करून दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर खुललेले स्मित 
पुणे

Valentine Day : ‘व्हॅलेंटाइन डे’चे हॅशटॅश सेलिब्रेशन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘टू माय व्हॅलेंटाइन...हॅप्पी व्हॅलेंटाइन डे, ’असे म्हणत प्रेमी युगुलांनी एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने दुकान, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली होती. प्रियजणांना भेटवस्तू घेण्यासाठी सकाळपासूनच अनेकांची लगबग सुरू होती.

बदलत्या काळात प्रेम व्यक्त करण्याची पद्धती बदलल्या आहेत. ‘हॅशटॅग’च्या युगात भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ हा हक्काचा दिवस झालाय. आता ‘व्हॅलेंटाइन डे’ हे एका दिवसाचे सेलिब्रिशन राहिले नसून, तर आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास सेलिब्रिशन करण्यात येते. या सेलिब्रिशनमध्ये पहिल्याच दिवशी ‘रोझ डे’ असतो. या ‘व्हॅलेंटाइन’ वीकमध्ये शुभेच्छा संदेश, चॉकलेट, फुले, अशा विविध आकर्षक, आवडत्या वस्तू जवळच्या व्यक्तीला देऊन प्रेम व्यक्त करण्याचा नवा ‘ट्रेंड’ रुजला आहे. 

‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने तरुणाई प्रेमाच्या रंगात रंगली होती. महाविद्यालयातही नेहमी असणारी विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्याचे चित्र होते. संभाजीनगर येथील नॉव्हेल्स एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’ दिवस ‘लायब्ररी डे’ म्हणून साजरा केला. महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही केल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली. गझलकार प्रदीप निफाडकर यांनी विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’ साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खेलो इंडिया बीच कबड्डीत महाराष्ट्राची धडाकेबाज सलामी, दीव-दमण अन् दिल्ली संघांचा उडवला धुव्वा

Panchang 6 January 2026: आजच्या दिवशी गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 06 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: तांदूळ अन् कांदापातपासून बनवा टेस्टी आयते, सोपी आहे रेसिपी

छोटी मुले; मोठ्या समस्या

SCROLL FOR NEXT