Untitled-2.jpg 
पुणे

पुण्यात गुंडांकडून 55 गाड्यांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकारनगर तळजाई वसाहत झोपडपट्टी येथील 55 गाड्यांची तोडफोड केली. यापूर्वी याच ठिकाणी अशी घटना घडून 50 ते 55 गाड्यांची सीट फाडून गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक दहशतीखाली आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

यामध्ये रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सहकारनगरच्या तळजाई टेकडी भागात पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. गुंडांनी 55 ते 60 गाड्या फोडल्या. यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करत आहेत.

गुंडांच्या या दहशतीमुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यात वारंवार अशाप्रकारच्या तोडफोड, मारहाण आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत.

परिसरातील काही टोळ्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी अधूनमधून असे प्रकार करत असल्याचंही बोललं जात आहे.दरम्यान, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पुणे पोलिसांना अद्यापही या गुंडांवर वचक निर्माण करणं शक्य झालं नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT