पुणे

वाणेवाडी शाळेत लोकसहभागातून बालवाचनालय

CD

सोमेश्वरनगर, ता. ५ ः वाणेवाडी (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ‘साद संवाद स्वच्छता ग्रुप’च्या तरूणांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ‘स्व. सिद्धांत जगताप बालवाचनालया’चा प्रारंभ सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळचे प्रतिनिधी संतोष शेंडकर होते. यावेळी पुरुषोत्तम जगताप म्हणाले, ‘‘गावागावांत दरवर्षी यात्रा-जत्रा यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. ते करतानाच खर्चाचा काही वाटा शाळा आणि वाचनालय याकडे वळविणे आता काळाची गरज आहे. सरकारी शाळांमधल्या सामान्य घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि वाचनालय उभारणीतून वाचनसंस्कृती रुजवून भावी पिढ्या विचारप्रवण बनविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे’’
‘कुल्फी’ त्रैमासिकाचे संपादक ऋषीकेश दाभोळकर म्हणाले, ‘‘मुलांना पुस्तके खूप आवडतात फक्त मोठ्यांनी त्यांच्यापर्यंत पुस्तके पोचवायला हवीत. पुस्तकं कपाटात बंद करू नयेत ती हाताला लागतील, डोळ्यांना दिसतील अशी ठेवावीत.’’ संतोष शेंडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उद्योजक सुनील भोसले, डॉ. रवींद्र सावंत, विक्रम भोसले, पोपटराव भोसले, परेश ज. म., अनिल चाचर, हेमंत गायकवाड, चंद्रशेखर जगताप, कालिदास गरुड, दीपक साखरे, अजित भोसले, शशिकांत जेधे, शंकर कोकरे, मुख्याध्यापिका ए. पी. कोंढाळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डी. वाय. जगताप यांनी केले. सूत्रसंचालन मनोज दीक्षित यांनी केले तर आभार अॅड. नवनाथ भोसले यांनी मानले.

अनोखे बालवाचनालय
वाणेवाडी, रामनगर, मळशी या तिन्ही प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी वाणेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या खोलीत लोकवर्गणीतून बालवाचनालय सुरू केले आहे. खोलीला मुलांच्या आवडीचे रंग दिले असून आकर्षक चित्रे काढली आहेत. पुस्तके हाताला येतील एवढ्या उंचीवर भिंतींवरच रचना केली आहे. जमिनीवर गोल, चौकोनी असे आकर्षक टेबल टाकून त्यावर पुस्तके सजावटीसारखी मांडली आहेत. शेकडो पुस्तके डोळ्यांसमोर पाहून मुले मोहरून गेली होती. लोकसहभागातून टप्प्याटप्प्याने पुस्तके आणि वाचनखोल्या वाढविल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Madhav Gadgil: पर्यावरण चळवळीचा वैज्ञानिक आधार हरवला, डॉ. माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन!

Latest Maharashtra News Updates : नागपुरात ६५ हजार २८१ दुबार मतदार

Pune Traffic Alert : ट्रॅफिक अपडेट! पुणे शहराला जोडणारा महत्वाचा मार्ग ७ दिवस बंद राहणार

Pune News : रीलस्टार अथर्व सुदामे याला ‘पीएमपी’चा दणका; भरावा लागणार ५० हजारांचा दंड

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच महिलेने असं काही म्हटलं की… क्षणभर सगळे स्तब्ध झाले! पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT