Vanraj Andekar Murder Sisters Arrested Esakal
पुणे

Vanraj Andekar Murder: वनराज आंदेकरच्या बहिणींना अटक, वडिलांनी केले होते मोठे आरोप, १२ तासात आवळल्या मुसक्या

Vanraj Andekar Murder Sisters Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे.

आशुतोष मसगौंडे

पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

आता वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात समर्थ पोलिसांनी 10 ते 12 आरोपींची ओळख पटवली असून काही जणांना अटक केली आहे.

पुण्यातील नानापेठ येथील डोके तालीम परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आंदेकरांच्या हत्येची घटना घडली होती.

दरम्यान हत्या झाल्यानंतर आंदेकर यांच्या नातेवाईकांवर खुनाचा संशय व्यक्त होत होता. आता आंदेकरांच्या वडिलांनी त्यांच्याच मुलींविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही अटक कारवाई सुरू केली आहे.

आंदेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच काल रात्री हडपसरमध्येही एका फायनान्स मॅनेजरची हत्या झाली होती. त्यामुळे शहरातील सरक्षतेबाबत नागकरिकांकडून भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सीसीटीव्हीत हत्येचा थरार कैद

दरम्यान रविवारी झालेल्या या हत्येच्या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेजस समोर आले आहेत. यामध्ये सुमारे 12 हल्लेखोर आंदेकर यांच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. हे हल्लेखोर 5-6 दुचाकींवर येत एकाच वेळी आंदेकर यांच्यावर हल्ला करत आहेत.

यावेळी वनराज आंदेकरांनी जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याच प्रयत्न केला तेव्हा एकाने त्यांच्या कानाजवळ गोळी झाडली. पुढे आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi China Visit: मोठी बातमी! गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर जाणार

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; कर्जबाजारी बापाचा निर्भिड पुत्र, मुंढेंची २४ वी बदली का झाली?

Latest Marathi News Updates Live : मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

Mumbai-Pune Accident: मुंबई-पुणे प्रवास बनतोय जीवघेणा! बळींचा आकडा टेन्शन वाढवणारा; धक्कादायक आकडेवारी समोर

Pune News : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीने वसतिगृहातील एका खोलीत गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT