Raj Thackeray and Vasant More Raj Thackeray and Vasant More
पुणे

राज ठाकरे पुण्यात... पण वसंत मोरे दौऱ्यातून गायब

ओमकार वाबळे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं. यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. (Raj Thackeray in Pune)

दरम्यान, वसंत मोरे यांनी मुंबईत जाऊन 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेटही घेतली. यानंतर पक्षातील वादळ शमल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी पोस्ट करून मी मनसेतच असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम लावला. यानंतर त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात वसंत मोरे गायब असल्याचं दिसतंय. (Vasant More)

मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर मात्र दौऱ्यात कोणालाही दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीने सध्या पुन्हा चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि मोरे यांच्यात दुरावा निर्माण झाल्यापासून मोरे पक्षाला रामराम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. पक्षपदापासून दूर केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनीही फोन केल्याच्या बातम्या होत्या. मात्र, मनसेत कायम राहणार असल्याचं सांगत त्यांनी भूमिका मांडली.

राज ठाकरे एरव्ही पुण्याच्या दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी त्यांच्या दिमतीला असतात. पुण्यातील राजमहाल नावाच्या इमारतीत ठाकरे वास्तव्यास असतात. औरंगाबादला निघण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात पोहोचले आहेत. १०० पुरोहितांच्या मार्फत मंत्रांचं पठण आणि काही धार्मिक विधी होणार आहेत. मात्र राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे यांची झलक कोणालाही मिळाली नाही. ते थेट औरंगाबादला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. वसंत मोरे २ दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मनसे नेत्यांकडून मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT