Vasant More News | MNS News Updates 
पुणे

मुख्यमंत्र्यांच्या फोन कॉलनंतर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला, म्हणाले...

ओमकार वाबळे

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांविरोधात पुकारलेल्या भूमिकेबद्दल पक्षांतर्गत काही जणांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये पुण्याचे मनसे शहरप्रमुख वसंत मोरे आघाडीवर होते. रमजान सुरू असल्याने मुस्लीम बांधवांविरोधात कोणतंही पाऊल उचलणार नाही, असं मोरे म्हणाले.

यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. शहराध्यक्ष पदावरून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे पुण्याची सूत्र देण्यात आली आहेत. (CM Uddhav Thackeray Calls Vasant More)

आता वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोरेंनी संपूर्ण प्रकरणावरील मौन सोडलं आहे. लवकरच ते राज ठाकरेंच्या भेटीलाही जाणार असल्याचं सांगितलंय.

मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. तसेच त्यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी अनेक पक्षांचे नेते संपर्कात असल्याचं खुद्द मोरे यांनी म्हटलं होतं. याआधी पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही मनसेतील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात यावं, असं म्हटलं होतं. आता मोरे यांनीच संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ दिवस झाले, शिवसेनेत येण्याची ऑफर जरी दिली असली तरी मी महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण मोरेंनी आज दिलं.

मोरे आणि बाबर या एका नाण्याच्या दोन बाजू

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत, असं ते म्हणाले. प्रत्येक पक्षाच्या लोकांना मी सांगतोय की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस आहे. मात्र माझी पक्षातून हकालपट्टी झाली, या शब्दावरून माझे कार्यकर्ते कालपासून नाराज आहेत.

हकालपट्टी पक्षातून होते पदावरून नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. सोमवारी राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मी १०० टक्के मनसेत राहणार आहे, असं ते म्हणाले. त्यामुळेच अद्याप मनसेचा बॅज लावून असल्याचे मोरेंनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT