vsi.jpg 
पुणे

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आले एकत्र; काय झाली चर्चा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते ऊस भूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी नेते अजित पवार व हर्षवर्धन पाटील एकत्र बसले होते याचीच चर्चा मिडीयात सुरु होती.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अर्थमंत्री जयंत पाटील, अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, प्रकाश आवाडे, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.

दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी साखर संघाच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

तसेच यावेळी दत्त शेतकरी साखर कारखाना शिरोळ तालुका हातकणंगले येथील शेतकरी जवाहर पोतदार यांना खोडवा हंगामातील पहिला पुरस्कार मिळाला. मध्य विभागातून पांडुरंग साखर कारखाना विभाग श्रीपुर माळशिरस सोलापूर विकास व संवर्धन पुरस्कार मिळाला. विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना सांगलीस तर दूधगंगा वेदगंगा कारखाना कागल कोल्हापूर द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील, अजित पवार एकत्र बसले होते, याचीच चर्चा सोशल मिडीयात रंगली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शरद पवार यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT