pune- nashik road.jpg 
पुणे

खेडमधील भाजीविक्रेत्यांनी लढवली 'अशी' नामी शक्कल...!

जयदीप हिरवे

सातगाव पठार (पुणे) : कोरोनामुळे गावोगावचे आठवडे बाजार बंद झाले असल्याने भाजीविक्रेत्यांना भाजी विकण्यासाठी पर्यायी जागा शोधावी लागत आहे. त्यामुळेच नामी शक्कल लढवत या भाजीविक्रेत्या शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठवरून खेडच्या दिशेने जाताना खेड घाटाच्या सुरवातीला महामार्गाच्या कडेलाच भाजीविक्री सुरु केली आहे. येथे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळत असल्याने महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीदेखील भाजी घेण्यासाठी या ठिकाणी थांबत आहेत.

कोरोनामुळे अनेक बदल पहावयास मिळत आहे. त्यातीलच हा एक बदल आहे. कारण गावोगावचे आठवडे बाजार गेले कित्येक महिने बंद असल्याने भाजी विक्रेते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी भाजी विकण्यासाठी शेवटी महामार्गाचा पर्याय निवडत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले ग्राहक बनविले आणि त्यांची ही शक्कल चांगलीच फायदेशीर ठरत आहे. 


पहिल्यांदा एकच भाजीवक्रेता आला. त्यांनतर त्याचे पाहून इथे आता जवळच्या गावांतून अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकवलेली भाजी विक्रीसाठी घेवून येत आहेत. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अगदी सहजच डोळ्यांत भरेल असा हा भाजीपाला दिसत असल्याने आपसूकच इथून प्रवास करताना अनेक प्रवासी गाडी थांबवून भाजीपाला खरेदी करत आहेत.

स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकदेखील खूश होतात आणि शेतकऱ्यांनादेखील दोन पैसे हाताशी मिळत आहेत. थेट शेतातून काढलेली भाजी मिळत असल्याने परिसरातील गावांतील नागरीक देखील भाजी खरेदीसाठी इथे येतात. त्यामुळे भविष्यात भाजीबाजाराचे हे एक चांगले ठिकाण बनू शकते अशी या विक्रेत्यांना अाशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT