राजगुरुनगर (चांडोली, ता. खेड) - फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका नसल्याने वाहनांच्या लागलेल्या रांगा. 
पुणे

फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने वाहनांच्या रांगा

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर (चांडोली) टोल नाक्‍यावर फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने फास्टॅग यंत्रणेचा परिणाम दिसत नाही. लांब पल्ल्याची व्यावसायिक वाहने सोडली, तर अनेक वाहनधारकांनी अद्याप फास्टॅग खाते उघडले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जुन्याच पद्धतीने टोलवसुली चालू असून, वाहनांच्या रांगा जवळपास तशाच आहेत.

येथे फास्टॅगचे फलक लागले आहेत. पण, फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका नाही. त्यामुळे फास्टॅगधारकांना वेळेचा वेगळा फायदा मिळत नाही. या टोल नाक्‍यावर स्थानिक वाहनचालकांकडून टोल घेतला जात नाही. त्यामुळे त्यांनी फास्टॅग काढण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. परिसरातील वाहनांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी वेगळी फास्टॅग मार्गिका ठेवणे अवघडच आहे. ज्या वाहनांना फास्टॅग स्टिकर आहे, ती सर्व वाहने ‘फास्टॅग’ यंत्रणेद्वारे ओळखली जात नाहीत. अशावेळी फास्टॅग ईटीसी गन वापरून खात्री करावी लागते. त्यामुळे अनेकदा वेळ वाचण्याऐवजी वेळ वाया जातो. शिवाय, टोलवरच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत होते. असे वाहन थांबून राहिल्याने मागे लगेच रांग वाढायला सुरुवात होते. अनेकदा वाहनधारकाच्या फास्टॅग खात्यात बॅलन्स नसतो. पण, तो ते मान्य न करता टोल कर्मचाऱ्यांना त्रास देऊन टोल वाचविण्याचा प्रयत्न करतो, असे येथील कर्मचारी सांगतात.

या टोल नाक्‍यावरून सरासरी ५०० वाहने ‘फास्टॅग’ धारक जात आहेत, तर दोन हजारांच्या आसपास इतर वाहने जात आहेत. वाहनांना येण्यासाठी तीन आणि जाण्यासाठी तीन, अशा सहा लेन आहेत. त्यामुळे फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवणे शक्‍य होत नाही.  
- विजय यादव, उपव्यवस्थापक, आयआरबी टोल नाका, चांडोली, ता. खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार; पण भाजपच्याच आमदाराचा कडाडून विरोध

Year Ender 2025: कुंभमेळ्यातील मोनालिसा ते राजू कलाकार... या वर्षी सोशल मीडियावर व्हायरल झाले 'हे' ६ चेहरे, रात्रीत बनले सुपरस्टार

'लिव्ह -इनमध्ये राहू, ट्राय करु हे सगळं...' रिंकू राजगुरुने सिच्युएशनशिपबद्दल मांडली भूमिका, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : बांग्लादेशातील हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात निदर्शने

Karad Crime:'कऱ्हाड तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी'; बेड्यासह पळ काढलेल्या आरोपीला पुण्यातून घेतले ताब्यात..

SCROLL FOR NEXT