pune zilla parishad esakal
पुणे

"वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करावे, तर मळवली रेल्वे स्टेशनला..."

अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता.२२) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता.२२) झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सभागृहात केली.

वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने याबाबतची मागणी शिवतरे यांच्याकडे केली होती. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर केला. वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे व दिनकर धरपाळे यांनी हा ठराव मंजूर केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

दरम्यान, मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे मांडला. या तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे केल्याचे मराठे यांनी सांगितले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT