corona
corona 
पुणे

वेल्हे तालुक्याची अशी होत आहे कोरोनाच्या मगरमिठीतून सुटका..

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे परिसरातील २५ मे रोजी पाठविण्यात आलेल्या बारा जणांची कोरोना टेस्ट  आज निगेटिव्ह आली असून, येथील अठरा जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. त्यामुळे प्रशासनाने तूर्तास मोकळा श्वास घेतला असला, तरी येथील साखळी तुटण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

वडगाव झांजे परिसरात ९ मे रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर अठरा दिवसांत येथील रुग्ण संख्या तेवीसवर पोहचली होती. या परिसरामध्ये प्रशासनाकडून १५६ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती, तर या परिसरातील ९०४ जणांना होम क्वारंटाइन करत तीन किलोमीटर परिसर सील केला होता, तर नऊ गावे बफर झोन घोषित करण्यात आली होती. अजुनही या परिसरातील लॉकडाउन परिस्थिती जैसे थे राहिल, अशी माहिती तहलीदार शिवाजी शिंदे यांनी दिली. 

या परिसरामधील क्वारंटान केलेल्या प्रत्येक नागरिकाची हजेरी घेत तपासणी करण्यात येणार असून, आरोग्य विभागाकडून कार्यरत टिम बारकाईने लक्ष ठेवणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली. तसेच, या गावांमध्ये नियमित दोनदा सोडीयम क्लेराईडची फवारणी सुरुच राहणार असून,  ध्वनीक्षेपकावरून रोजच्या रोज सुचना देणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नाकाबंदी करण्यात आली असून, तिची अंमलबजावणी काटेकेरपणे केली जाणार असल्याचे वेल्ह्याचे सहाक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यास मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तीनदा भेट दिली होती, तर तालुक्याच्या रेड झोन परिसरामध्ये लॉकडाउन आणखी कडक करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
वेल्हे तालुक्यामध्ये एकुण 32 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर सव्वीस जणांनी कोरोणावर मात केली आहे. तर पाच जणांवर उपचार चालू आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतात पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरे काय म्हणाले?

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT