Village 
पुणे

कोरोनाच्या संकटात गावाचाच आधार

मंजूषा कुलकर्णी

पुणे - ‘पुनामें कोरोना इतना फैल रहा है और हाथ में काम नही, तो अभी परिवार को लेकर घर जा रहे और कर भी क्या सकते है,’  लॅाकडाउनमुळे हतबल झालेला अन गावाकडे जाण्यासाठी ओढ लागलेला संजू (नाव बदलेले आहे) बोलत होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने विशेष श्रमिक रेल्वेचे नियोजन केल्यानंतर राज्यातून आत्तापर्यंत लाखो मजूर त्यांच्या राज्यात पोचले आहे. काही अजूनही प्रतीक्षेत आहेत. पुण्यातून रविवारी बिहारसाठी रेल्वे सोडणार असल्याचा निरोप मिळाल्यावर तळेगाव, आकुर्डी,  निगडी, चिंचवड परिसरात काम करणारे स्थलांतरित मजूर आज सकाळी सातपासून देहूरोड पोलिस स्थानकात जमण्यास सुरुवात झाली होती. तेथून त्यांना पीएमपीने रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यात येणार होते. साधारण नऊ वाजेपर्यंत शेकडो मजूर घरी जाण्याच्या ओढीने घरातील चंबूगबाळे आवरुन दाखल झाले होते. काही जण एकटे होते, तर काही जण कुटुंबासह आले होते. बहुतेक जणांचे लक्ष आपले नाव कधी पुकारले जाईल याकडे होते तर गावी जायला मिळणार याचा आनंद लहान मुलांच्या चेहऱ्यावर होता.

पोलिस स्थानकावर जमलेल्या अनेकांनी कुटुंबाला गावी सोडून एकटेच परत येणार असल्याचे सांगितले. कुटुंबाला मात्र अजून एक-दोन वर्षे तरी येथे आणणार नाही, असा विचार त्यांचे म्हणणे होते. गावी गेल्यावर कोरोनामुळे क्वारंटाइन व्हावे लागले तरी आपल्या गावी पोचल्याचा आनंद व त्यातून मिळणारे बळ जास्त मोठे असल्याचे रियाझ म्हणाला.

पुण्यात आम्ही उपरेच
हळूहळू उद्योगधंदा सुरु होत असताना गावी का जात आहात असे विचारले असता पत्नी व बाळासह आलेला सोहेल म्हणाला की, माझे काम अद्याप सुरू झालेले नाही आणि कधी होणार याची माहिती नाही. त्यामुळे गावी घरी निघालो आहे. शेवटी आम्ही येथे उपरेच ठरतो. येथे कोठेही गेलो तरी कुठून आला, काय करता असे विचारले जाते. गावात असे होत नाही. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती निवळल्यावर परत येईनच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT