Vidarbha great contribution to the democratic movement said Sharad Pawar
Vidarbha great contribution to the democratic movement said Sharad Pawar 
पुणे

विदर्भाचं लोकशाही चळवळीत मोठं योगदान : शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : "राज्यातील अनेक जिल्ह्यांत लोकशाहीवादी समाजनिर्मितीसाठी प्रामाणिक काम सुरू आहे. त्यातील बऱ्याच लोकांचे नावे आपल्याला माहीत नाहीत. यवतमाळचे बाळासाहेब सरोदे हे अशा दुर्मिळ, निगर्वी व सातत्याने समाज परिवर्तनासाठी कार्यरत लोकांपैकी एक होते,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

"लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहन' लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिक्षणतज्ज्ञ मंगला सरोदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, मानवीहक्क विश्‍लेषक ऍड. असीम सरोदे, ऍड स्मिता सिंगलकर, उद्योजक सुधीर सरोदे, अमित सरोदे उपस्थित होते.

पवार म्हणाले, "गांधीवादी विचारांना पुढे नेण्यात यवतमाळ जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्याच विचारांचा वसा पुढे नेत सरोदे कुटुंबीय समाजातील विविध घटकांसोबत काम करत आहेत. बाळासाहेब सरोदे यांची साधी राहणी, स्पष्ट आणि निर्मळ विचार हे गुण जन्मभर जपले.''

ऍड. सरोदे म्हणाले, "माझे बाबा नेमकेपणाने बोलायचे व वैचारिक नेमकेपणा त्यांना वाचन आणि चिंतनातून मिळाला. जीवनात नवीन संदर्भ भरणारी आणि उद्देश देणारी त्यांची अभिव्यक्ती अनेकांना घडविणारी ठरली. समतेच्या मार्गावर नेणारे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात पोचविण्यासाठी "लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे स्मृती प्रबोधन वाहन' अनेक जिल्ह्यात आपल्याला दिसेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT