Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray speech pune kothrud chandrakant patil
Vidhan Sabha 2019 mns chief raj thackeray speech pune kothrud chandrakant patil 
पुणे

Vidhan Sabha 2019 : कोथरूडकरांना एवढंच ठरवायचं आहे, बाहेरचा की कोथरूडचा? : राज ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : कोथरूडची निवडणूक एकदम सोपी हवी आहे. तुम्हाला कोथरूडचा आमदार कोथरूडचा हवा की बाहेरचा? एवढाच निर्णय कोथरूडकरांनी घ्यायचा आहे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राज यांची आज, पुण्यात कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली. त्या त्यांनी भाजप उमेदवारा चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केले. 

कोथरूडकरांना गृहित धरलं जातंय
राज ठाकरे म्हणाले, 'कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार लादला जातो. त्याचं दुसरं तिसरं कारण नाही. एकमेव कारण असतं. तुम्हाला गृहित धरलेलं असतं. कोठूनही उमेदवार आणला तरी तुम्ही त्यांनाच मतदान करणार हे गृहित धरलं जातं. सत्ता डोक्यात गेल्यानंतर तुम्हाला गृहित धरलं जातं. मतदारसंघात कोणत्या जातीची मतं जास्त आहे. त्यानुसार उमेदवार देणं, असं कधी महाराष्ट्रात नव्हतं. जातीपातींवर प्रबोधन करणारा महाराष्ट्र कुठं चाललाय? महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करायचा आहे का? साहित्यिक, कालाकार, महापुरुषांना जातींमध्ये वाटू लागलो. प्रत्येक गोष्टी जातीत बघायची आहे का? मतदारसंघात उमेदवार काम करणारा आहे की नाही, एवढाच उमेदवारीचा निकष असला पाहिजे. कोथरूडची निवडणूक एकदम सोपी आहे. आमदार इथला हवाय की, बाहेरचा एवढाच निर्णय कोथरूडकरांना घ्यायचा आहे. हाकेला ओ देणारा माणूस हवा. निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील तुमच्या हाताला तरी लागतील का?'

मंदीचं संकट खूपच गंभीर
राज ठाकरे म्हणाले, 'मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे. हे माझं नाही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं वक्तव्य आहे. पुण्यात अनेक कंपन्या कामगार कपात करत आहेत. ज्यांच्या आहेत. त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. नवीन उद्योग कुठून येणार आहेत.? केवळ नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे हे दिवस आले आहेत. माझं त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. जर, निर्णय देशांच्या अंगावर येत असतील, तर बोलायला पाहिजे.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT