Dilip mohite Patil and Vilas lande sakal
पुणे

Dilip Mohite : हिंमत असेल तर विलास लांडे यांनी माझ्याविरुद्ध विधानसभा लढवावी

हिंमत असेल तर खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक माझ्या विरोधात लढवावी, असे आमदार दिलीप मोहिते यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना खुले आवाहन दिले आहे.

प्रशांत पाटील

चाकण - ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे काही नगरसेवक शरद पवार यांच्यासाठी स्वतःहून बैठका घेत आहेत.

नगरसेवकांची लोणावळा येथे नुकतीच बैठक झाली. यावेळी लांडे उपस्थित होते. त्याचे पुरावेही आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर खेड-आळंदी विधानसभेची निवडणूक माझ्या विरोधात लढवावी,’ असे आमदार दिलीप मोहिते यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना खुले आवाहन दिले आहे.

चाकण (ता. खेड) येथे शनिवारी (ता. ३) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दिलीप मोहिते बोलत होते. खेड तालुक्यात येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित आहे.

त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्यात खरी लढत होणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील गृहमंत्री असताना विलास लांडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व आर. आर पाटील यांना माझ्याबद्दल खोटे सांगून मला व माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला होता. माझ्या विरोधात खोटे सांगून शरद पवारांचे मतही माझ्याबद्दल वाईट बनवले होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी बरोबर राहून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेले आहे.

- दिलीप मोहिते, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

Navi Mumbai News: पनवेलचा पाणी प्रश्न सुटण्यास २०२६ उजाडणार, न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्‍पास विलंब!

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

SCROLL FOR NEXT