पुणे

‘प्री वेडिंग’ फोटोशूटसाठी गावाकडं चला!

सुदाम बिडकर

पारगाव - कोरोनोमुळे संपूर्ण जग बदलून गेले आहे. विवाह सोहळ्याच्या पद्धती बदलल्या आहेत. कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न होत असल्याने खर्चात मोठी बचत होत आहे. त्यामुळे वधुवरांची ‘प्री वेडिंग’ फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगला पसंती वाढली आहे. शहरी भागातील वधुवरांकडून फोटोग्राफी व शूटिंगसाठी ग्रामीण भागातील शेती आणि पुरातन महाल व वाडे यांच्या लोकेशनला जास्त पसंती दिली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘प्री वेडिंग’ फोटोशूटसाठी महाबळेश्वर, गोवा, माथेरान, पाचगणी आदी हिल स्टेशनची निवड केली जायची. यासाठी स्थानिक महागड्या हॉटेल व रिसोर्टचे बुकिंग केले जायचे. परंतु, कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाउनने उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. मागील महिनाभरापासून व्यवहार सुरळीत होऊ लागले असले, तरी मंदीचे सावट कायम आहे. नागरिक पर्यटनस्थळे असणाऱ्या हॉटेल व रिसॉर्टमध्ये जायला अजून धजावत नाही. त्यामुळे प्री वेडिंगसाठी वधुवरांकडून ग्रामीण भागात निसर्गाच्या सान्निध्यात व गर्दीपासून दूर असलेल्या रिसॉर्टची निवड केली जाते.

तसेच, पुरातन महाल व वाड्यांनाही पसंती दिली जाते. काहींना ग्रामीण भागातील शेतातील पिकांमध्ये फोटोग्राफी करायला आवडते. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळातही खासगी मालकी असलेल्या महाल व राजवाडे मालकांना आणि ग्रामीण भागातील रिसोर्टला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. काही राजवाडे व महालांची मालकी खासगी व्यक्तींकडे आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात शुल्क आकारले जाते. परंतु, त्यामुळे तेथे स्वच्छता राखली जाते. सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाते. त्यामुळे अशा वास्तूंचे जतन होईल, असे छायाचित्रकार शरद पोखरकर व चेतन लोखंडे यांनी सांगितले.

या ठिकाणांना पसंती
भोर शहरातील राजवाडा, जुन्नरजवळील हबशी महाल, खेड तालुक्‍यातील वाफगावमधील होळकरवाडा आदी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या पुरातन ठिकाणांना वधुवरांकडून फोटोग्राफीसाठी खास 
पसंती असते. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT