Vimannagar Fire sakal
पुणे

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

विमाननगर येथील न्याती इम्प्रेस या व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील एका कार्यालयाला आज दुपारी साडेचार वाजता आग लागल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - विमाननगर येथील न्याती इम्प्रेस या व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील एका कार्यालयाला आज दुपारी साडेचार वाजता आग लागल्याची घटना घडली. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी यांत्रिक उंच शिडीचा वापर करून तीन बंबांच्या सहाय्याने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

विमाननगर येथे फिनिक्स मॉल जवळ ही व्यवसायिक इमारत आहे. आग लागलेल्या कार्यालयात फर्निचर चे काम सुरू होते. त्यावेळी शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या आगीची झळ वरच्या मजल्यावर रिकाम्या कार्यालयालाही बसली.

धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इमारतीच्या काचा फोडून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. कार्यालयातील फर्निचरचे आगीमध्ये नुकसान झाले, अशी माहिती अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगड यांनी दिली.

आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारतीमधील इतर व्यावसायिक कार्यालय तातडीने निर्मनुष्य करण्यात आले होते. मुख्य चौकातील इमारतीला आग लागल्यामुळे आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Ajit Pawar Death News LIVE Updates: सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत दाखल, भावनिक वातावरण

Ajit Pawar Plane Crash : अपघातग्रस्त विमान चालवणारे पायलट नेमके कोण होते? १५ वर्ष विमान चालवण्याचा होता अनुभव

Ajit Pawar: 'पिंपरी-चिंचवड ते बारामती, विकासाची ठसठशीत छाप'; राज ठाकरेंनी आठवला अजित पवारांचा प्रवास, भावनिक पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT