दौंड (पुणे) : दौंड शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीला कसलेही शारीरिक अंतर न पाळता हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिताच्या उपाययोजनांचा आढावा देखील घेण्यात आला.
आंबेगावकरांनो सावधान, कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतोय
दौंड पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात २ जून रोजी खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली होती. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे, माहिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका पानसरे, दौंड पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे, दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे, गट विकास अधिकारी गणेश मोरे, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, लक्ष्मण सातपुते, गणेश कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे व पंचायत समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलविल्याने अनिच्छेने अधिकारी व कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले साहित्य व अडगळ काढण्याची प्रशासनाने तसदी घेतली असती, तर बैठकीसाठी शारीरिक अंतर पाळणे शक्य झाले असते. परंतु, पदाधिकारी शारीरिक अंतर न पाळता बसले होते, तर त्यांच्या मागे बसलेले काही सदस्य सोईने तोंडाला मास्क लावत होते. विविध विभागांचे अधिकारी देखील दाटीवाटीने खुर्च्यांवर बसले होते. पदाधिकाऱ्यांचे स्वागत दौंड पंचायत समितीकडून रोप व सॅनिटायझर बाटली देऊन करण्यात आले होते, परंतु एकाही पदाधिकाऱ्याने स्वागत स्वीकारताना हॅण्डग्लोव्हज घातले नव्हते.
या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, खरीप हंगाम आणि पाणी टंचाई, शाळा व अंगणवाडी पोषण आहार वितरण, शरद भोजन योजना, रोजगार हमी योजना, आदींचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. सदस्यांनी सूचना करीत येणाऱ्या अडचणी मांडल्या. अधिकारी वर्गाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना, खरिपाची तयारी व पाणीटंचाई निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सररकारने शासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकांसंबंधी स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही त्याचे बैठकीत उल्लंघन करण्यात आले. इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॅान्फरन्सिंग किंवा मोबाईल संचावरील अॅपच्या साह्याने व्हिडिओ कॅान्फरन्सिंगचा पर्याय उपलब्ध असतानाही दौंड येथे बैठक घेण्यात आली.
दौंड शहर व तालुक्यात २९ एप्रिल ते २ जून या कालावधीत एकूण ५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी दौंड शहरातील चार जणांचा मृत्यू झालेला आहे. ४६ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.