Rohit Pawar Datta bharne Esakal
पुणे

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Rohit Pawar shares video: आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे

कार्तिक पुजारी

पुणे- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, 'राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे एका व्यक्तीशी भांडत आहेत. व्यक्तीला शिवीगाळ देखील केली जात आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, अशाप्रकारची वक्तव्य ते करताना दिसत आहेत.' रोहित पवारांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय.

रोहित पवार पोस्टमध्ये काय म्हणालेत?

केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!, असं पवार म्हणाले आहेत.

भरणे यांच्याकडून यावर प्रतिक्रिया देताना सांगण्यात आलंय की, 'दोघांमधील भांडणे ते सोडवत होते.' यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, व्हिडिओ पाहून ते भांडण सोडवत होते असं वाटत नाही. ते समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत. एकाच व्यक्तीला ते बोलत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कोण भांडण सोडवतं? दरम्यान, या व्हिडिओवरुन दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होणार आहे. सदर व्हिडिओ कधीचा आहे किंवा कुठला आहे कळू शकलेलं नाही. तसेच, व्हिडिओच्या सत्यतेची पृष्टी 'सकाळ माध्यम समूह' करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रमावर पोलिसांचा ताबा; माजी महापौरांसह महापालिकेचे अधिकाऱ्यांना अडवले

Ganesh Visarjan 2025 : बाप्पाला काढ ना पप्पा, तो पाण्यात बुडतोय; गणरायाला निरोप देताना कोल्हापुरातील चिमुकला भावूक; पाहा VIDEO

Latest Maharashtra News Updates : विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात विदर्भातील ओबीसी संघटनांची बैठक सुरु

Man Kills Close Friend : जिवलग मित्राचा खून केला अन् रक्ताने माखलेला शर्ट फेकला ओढ्यात, पोलिसांना एक धागा सापडला अन्

SCROLL FOR NEXT