Vishal Agarwal ESakal
पुणे

Vishal Agarwal : विशाल अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडी रद्द करत पोलिस कोठीडीत रवानगी

या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका पोलिस आणि सरकारी वकील यांनी सत्र न्यायालयात करण्यात आली होती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ‘अंडरवर्ल्ड’सोबत संबंध असल्याचे सांगत जमीन व्यवहार प्रकरणात एका रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी ३२ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना गुरुवारपर्यत (ता.४ ) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यात अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका पोलिस आणि सरकारी वकील यांनी सत्र न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द करत अग्रवाल यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणानंतर बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्त अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०) या बापलेकासह त्यांचा साथीदार जसप्रीतसिंग राजपाल यांच्याविरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना नुकताच जामीन झाला आहे. मात्र, विशाल अगरवालला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याविरोधात तपास अधिकाऱ्यांच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सत्र न्यायालयात फौजदारी ‘रिव्हिजन’ अर्ज केला. विशाल अग्रवाल यांच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि फोनवरील संभाषण व व्हॉट्सअपवरील मेसेजबाबत तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. तो युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली.

दरम्यान, बावधनमधील एका सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अग्रवाल यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अग्रवाल यांना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्यांना हिंजवडीतील गुन्ह्यातून कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग केले जाणार आहे.

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

SCROLL FOR NEXT