accident 
पुणे

विठ्ठलवाडी बंधार्‍यावरून उसाचा ट्रॅक्टर घसरून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे - विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरून उसाची वाहतूक करणारी ट्रॉली व ट्रॅक्टर घसरून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. घटनेची नोंद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. विठ्ठलवाडीहुन पाटेठाणकडे ऊस घेऊन ट्रॅक्टर चालला होता. सोपान गोरे हा ट्रॅक्टर चालक अपघातातून वाचला असून, चालकाच्या शेजारी बसलेले उत्तम छबूराव नाटकर (वय ५०, रा. गांधीनगर, राहू, ता. दौंड)  यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विठ्ठलवाडी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जड वाहतूक करण्यासाठी धोकादायक असून, बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. बंधाऱ्यावरील धोकादायक वाहतुकी संदर्भात दै. सकाळने छायाचित्रासह  वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून जनजागृती केली होती. परिणामी गेल्या वर्षभरापासून पाटबंधारे विभागाने  या बंधाऱ्यावरील जड वाहनांची वाहतूक बंद केली होती.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पर्यायी व्यवस्था म्हणून पिंपरी सांडसच्या नवीन पुलावरून जड वाहतूक करण्यास पाटबंधारे विभागाने सांगितले होते. त्यासाठी विठ्ठलवाडी बंधाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाटबंधारे विभागाने बॅरिकेड लावले होते परंतु  पिंपरी सांडस येथील रस्ता वाहन चालकाला  दूर वाटत असल्याने अज्ञात व्यक्तीने विठ्ठलवाडी बंधाऱ्यावरील  बॅरिकेड  रात्रीच्या वेळी खोदून काढले,  तेव्हापासून  पुन्हा या पुलावरून जड वाहनांची  वाहतूक  सुरू झाली. त्यानंतर  ग्रामस्थांनी  बॅरिकेड काढल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडे  केली होती. 

बंधाऱ्याचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी झाले असून, हा पूल जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा खुलासा पाटबंधारे विभागाने केला असूनही नागरिकांनी बॅरिकेड काढून पुन्हा जड वाहतूक सुरू  केली आहे. शिरूर, दौंड व हवेली तालुक्याला जोडणारा हा बंधारा असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. या बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करून पुन्हा बॅरिकेड लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : शिर्डीत हनुमान जयंतीला ताकदीचा जल्लोष! 125 किलो गोटा उचलण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT