pooja chavan_sanjay rathod  
पुणे

पूजा चव्हाणशी झालेल्या संभाषणामधील 'तो' आवाज संजय राठोड यांचाच!

फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाशी संबंधीत मोबाईलमधील संभाषणासंदर्भातील न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल (Forensic report) पोलिसांना दोन महिन्यांपूर्वीच प्राप्त झाला आहे. चव्हाण व अन्य व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणातील आवाज हा माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचाच असल्याचे अहवालातून पुढे आले आहे, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

वानवडी येथील महंमदवाडीमध्ये पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपानंतर राज्यमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, मागील आठवड्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आणि राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरूच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

पूजा चव्हाण व दुसऱ्या व्यक्तीमध्ये मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाच्या 12 ऑडीओ क्‍लिप व्हायरल झाल्या होत्या. संबंधित ऑडीओ क्‍लिपसह मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाले होते. पूजाच्या आत्महत्येच्या चार ते पाच दिवसांपुर्वी दोघांमध्ये 90 मिनिटांपर्यंत संभाषण झाले होते. संबंधीत संभाषण हे बंजारा भाषेत असल्याने त्यावरुन विविध प्रकारचे तर्क लढविले जात होते. मात्र, संबंधीत कॉल रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ते न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पोलिसांना दोन महिन्यांपुर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र, पोलिसांकडून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हा अहवाल प्राप्त झाल्याचे तसेच त्यामध्ये प्रथमदर्शनी पूजासोबत बोलणारी व्यक्ती ही संजय राठोडच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शवविच्छेदन करताना पूजाचा व्हिसेराही राखून ठेवण्यता आला होता. त्यातील अहवालानुसार, तिने आत्महत्येपूर्वी दारू प्यायल्याचेही निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT