Shashi Tharoor 
पुणे

Shirur Lok Sabha: शिरुरमधील मतदाराला मतदानावेळी आली अडचण, थेट शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय झालं होतं?

Voter in Shirur loksabha: काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे- सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यातील मदतान पार पडले. यात शिरुर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता. यावेळी येथील मतदारांनी निर्माण झालेल्या अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामध्ये केदार अनिल गाडगीळ या मतदाराने 'एक्स'वर पोस्ट करत EVM मध्ये चिन्ह अंधूक दिसत असल्याचा आरोप केला होता.

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी 'एक्स'वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी हे सर्व अस्वस्थ करणारे आहे असं म्हटलं आहे. तुम्हाला कोणाला मतदान करायचे आहे हे माहिती असणे लोकशाहीतील नागरिकाची एक मूलभूत जबाबदारी आहे. पण, चुकीची माहिती असलेल्या नागरिकाला चुकीचे सरकार मिळते, असं ते म्हणाले.

मतदानावेळी वृद्ध मतदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना चिन्हांची मतपत्रिका देण्याची वेळ आली होती. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ‘घड्याळ’ हे चिन्ह शरद पवार गटाकडे होते. पण यावेळी पक्षात फुट पडल्याने अजित पवार गट ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तसेच शरदचंद्र पवार गट पक्षाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे चिन्हामध्ये देखील अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

शिरुरच्या मतदारांनी अमोल कोल्हे यांच्याऐवजी शिवाजीराव आढळराव यांना चिन्ह गोंधळामुळे पसंती दिल्याचा एक्स युजरचा दावा केला आहे. त्यामूळे शिरुर मतदारसंघात काही ठिकाणच्या मदतान केंद्रावर गदारोळ झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंविरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्यात चांगलीच चुरस असल्याचे पाहायला मिळाले.

दोन्ही नेत्यांनी प्रचारादरम्यान आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार, 51.25% मतदानाची नोंद तेथे झाली आहे. तर 2019 च्या आकडेवारीचा विचार केला तेथे 8 टक्यांची तफावत दिसत आहे. शिरुर मतदार संघात 2019 ला 59.44% एवढे मतदान झाले होते.

कोणत्या मतदारसंघात किती मतदान

शिरुर मतदारसंघात ५१.२५ टक्के , आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६१ टक्के, जुन्नरमध्ये ५६.३५ टक्के, खेड-आळंदीत ५५.२९ टक्के, भोसरीत ४६.२१ टक्के आणि हडपसरमध्ये ४५.३६ टक्के मतदान झाले.

(स्टोरी- मनोज साळवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT