Loksabha Election Voting sakal
पुणे

Loksabha Election Voting : बारामती मतदारसंघासाठी उद्या मतदान

अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदसंघाकरिता मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदसंघाकरिता मंगळवारी (ता. ७) मतदान होणार आहे. त्यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. त्या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहादरम्यान मतदान होईल. या मतदारसंघात एकूण २३ लाख ६२ हजार ४०७ मतदार; तर दोन हजार ५१६ मतदान केंद्रे आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी रविवारी दिली.

कडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीट दिली आहे. मतदानासाठी मोठी रांग असेल; तर त्यांच्यासाठी प्रतीक्षा हॉलमध्ये बसण्याची सुविधा केली आहे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असल्यास मांडव घालण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. वयोवृद्ध मतदारांचे केंद्रावर फूल देऊन स्वागत केले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

ईव्हीएम मशिनची सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थित पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशिनचे वाटप केले जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी अंतिम प्रशिक्षण घेतले जाईल. त्यानंतर कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होतील, असेही द्विवेदी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT