पुणे

वडगाव नगरपंचायतीमध्ये मंगळवारी पदग्रहण समारंभ

CD

वडगाव मावळ, ता. ५ : वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ मंगळवारी (ता. ६) होणार असून उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्याची निवड १२ तारखेला होणार असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
गेल्या २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीमध्ये बहुमत प्राप्त केले. भाजपने सहा जागा मिळवल्या तर दोन प्रभागात अपक्षांनी विजय प्राप्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे यांनी नगरपंचायतीच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला असून, त्यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ व नगरपंचायतीच्या वतीने सर्वांचा सत्कार समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १० वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक १२ तारखेला
वडगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली असून, नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा नवनिर्वाचित नगराध्यक्षा अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली १२ तारखेला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली. याच दिवशी उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक व स्वीकृत सदस्याची निवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी १० ते १२ उमेदवारी अर्ज दाखल करणे, दुपारी १२ ते १२.१५ अर्जांची छाननी, दुपारी १२.१५ ते १२.३० उमेदवारी अर्ज मागे घेणे, दुपारी १२.३० ते १ निवडणूक. उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत सदस्याची निवड जाहीर होईल, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT