पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदुष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी येत्या मंगळवारपर्यंत (ता.१५) मुदत आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सप्टेंबर अखेरीस प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत १७ मार्चला सोडत (लॉटरी) काढण्यात आली. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. राज्यातील एक लाख १५ हजार ४६० राखीव जागांसाठी जवळपास दोन लाख ९१ हजार ३६८ अर्ज आले होते. त्यातील एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची पहिल्या सोडतीत निवड झाली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ६० हजार ९२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
प्रवेशासाठी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशासाठी शाळेत जाणे शक्य नसल्यास पालकांनी ई-मेलद्वारे अथवा दूरध्वनीवर शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आढावा :
- आरटीई २५ टक्के राखीव जागा असणाऱ्या शाळांची संख्या : ९७२
- राखीव जागा : १६,९४९
- प्रवेशासाठी आलेले अर्ज : ६२,९१९
- पहिल्या सोडतीत निवडलेले अर्ज : १६,६१७
- प्रोव्हिजनल प्रवेश : ९,९८०
- प्रवेशाची निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ९,८५३
- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.