covid19 Sakal Media
पुणे

वालचंदनगर पोलिसांचा ज्येष्ठ रुग्णांना दिलासा

ज्येष्ठ नागरिकांना दिला मानसिक आधार

राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कोरोना केअर सेंटर, कोविड सेंटर व ज्येष्ठ नागरिकांना वालचंदनगर पोलस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देवून रुग्णांना दिलासा व सर्वसामान्य नागरिकांना मानसिक आधार दिला. इंदापूर तालुक्यासह जिल्हामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचे १६६३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अनेक रुग्णांना बेड व रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरोना केअर सेंटर, कोविड सेंटरला भेटी देवून सेंटरमधील डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांशी संवाद साधून रुग्णांना आधार दिला. तसेच हॉस्पिटल मध्ये असणारे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता यांची माहिती घेतली.

ऑक्सिजनवरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यास सांगितले. लासुर्णेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाची माहिती घेतली. ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी-गाठी-इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वालचंदनगर,आनंदनगर व जंक्शन परीसरामध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले कामानिमित्त पुणे, मुंबई तसेच परदेशामध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिक एकटेच घरी राहत असल्याने साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्या आरोग्याची चौकशी केली तसेच त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा काढा, व्हिटॅमिन गोळ्या, चवनप्राश, मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. तसेच गरज असल्याचे तातडीने पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT