Murder Case esakal
पुणे

Murder Case : महामार्गावर फिल्मी स्टाईल पाठलाग अन्.. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करणारा आरोपी 'असा' अडकला सापळ्यात

तरुणीच्या खून प्रकरणी अविराज रामचंद्र खरात (वय 22, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हरिदास कड

आरोपी व खून झालेली तरुणी यांचे दोन-तीन वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते. नंतर ही तरुणी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आली. त्यानंतर तिने आरोपीशी संपर्क तोडला.

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीमधील आंबेठाण (ता. खेड) गावच्या हद्दीत एका तरुणीच्या गळ्यावर, पोटावर चाकूने वार करून तिचा निर्घृणपणे खून (Murder Case) करण्यात आला. प्राची विजय माने (वय 21, रा. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

तरुणीच्या खून प्रकरणी अविराज रामचंद्र खरात (वय 22, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राचीने लग्नास (Marriage) नकार दिल्याने आरोपीने चिडून जाऊन तिच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून तिचा निर्घृणपणे खून करून पळून गेला होता. त्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिली.

आरोपीच्या मूळ गावी जाऊन घेतला शोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण ता. खेड येथे हा प्रकार घडला. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस हवालदार आढारी, सानप, भोसुरे, हणमंते, पोलीस शिपाई काळे, सूर्यवंशी, जैनक, बाळसराफ या पोलीस पथकाने आरोपीच्या मूळ गावी सांगली येथे जाऊन, तसेच घटनास्थळावरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून आरोपीचा शोध घेतला.

सातारा-कराड महामार्गावर रचला सापळा

आरोपी सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील दुचाकीवरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने सातारा ते कराड महामार्गावर सापळा रचून दहा ते पंधरा किलोमीटर आरोपीचा पाठलाग केला. आरोपी दुचाकी न थांबवता दुचाकी वेगात पुढे नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली. याबाबत काही माहिती नसताना पोलिसांनी हा तपास केला.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस हवालदार यदु आढारी,सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हणमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, राहुल सूर्यवंशी, नागेश माळी यांनी केली आहे.

लग्नास नकार दिल्याने खून

आरोपी व खून झालेली तरुणी यांचे दोन-तीन वर्षांपूर्वी प्रेम संबंध होते. नंतर ही तरुणी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आली. त्यानंतर तिने आरोपीशी संपर्क तोडला. कंपनीतील एकाशी ती बोलत होती. तिने संपर्क तोडल्याने व लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिचा खून केला. ही तरुणी एका खासगी कंपनीत काम करत होती. ती तिच्या मैत्रिणीसह आंबेठाण येथे राहत होती.

आरोपी आंबेठाण येथे आला होता. प्राचीशी मोबाईलवर संपर्क केला व तिला बोलावून घेतले. मोकळ्या पटांगणावर त्याने तिला बोलावले. तिचा मोबाईल त्याने हिसकावून घेतला. त्यानंतर तिच्याशी बाचाबाची केली. त्यानंतर त्याने तिच्यावर वार करून तो दुचाकीवरून पसार झाला होता. आरोपी त्याच्या मूळ गावी नोकरी करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT