पुणे

शिरूर तालुक्यात वार्डनिहाय मतदार याद्यांमुळे गावागावात गोंधळ 

भरत पचंगे

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये कुठल्याच ग्रामस्थांना न विचारता अनेक मतदारांचे वार्ड निहाय स्थलांतर केल्याने गावागावात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर कुणीही तलाठी याबाबत तक्रार अर्ज स्वीकारत नसल्याने महसूल यंत्रणे विरोधात संताप व्यक्त होत आहे.

शिरूर तालुक्यात मुदतवाढ मिळालेल्या व मुदत संपलेल्या ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाकडून सध्या जोरात सुरू आहे. त्यातील पहिल्याच टप्प्यात वार्ड पुनर्रचनेचे काम महसूलने पूर्णही केले. दरम्यान सदर पुनर्रचना ही एकाही गावात जाहीर दवंडी देऊन, कुठलीही सूचना न देता वा व्हर्चुल ग्रामसभा न घेता केल्याने केलेली पुनर्रचना सदोष व ग्रामस्थांवर थेट सक्तीने लादल्याच्या प्रतिक्रिया अनेक गावांमधून आहेत.

खरंतर वार्डांची मतदारनिहाय  पुनर्रचना आत्ता अन परस्पर का केली याचे उत्तर नवीन मतदार याद्यांमध्ये कुठेच मिळत नाही. शिक्रापूरचे उदाहरण द्यायचे झाल्यास इथे एक वार्ड १६०८ मतदारांचा तर दुसरा तब्बल दुप्पट म्हणजे ३५१० मतदारांचा करण्यात आला आहे. केंदुर येथे तर १६५ मतदार तर थेट दुसऱ्या एका वस्तीच्या वार्डात ढकलून  टाकून मतदारांना भौगोलीक विस्कळीत करून ठेवले आहे. निमगाव म्हाळुंगी येथे वार्डाची रचना बदलून मतदारांना अडचणीचे होईल असे थेट वार्डाचे विभाजन केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान असे प्रकार अनेक गावांमध्ये झाल्याचे पाबळच्या सरपंच पल्लवी डहाळे, केंदुरचे माजी उपसरपंच तुकाराम थिटे, सूर्यकांत थिटे, शिक्रापूरच्या सरपंच हेमलता राऊत यांनी दिली, तसेच तसे तक्रार अर्जही शिरूर तहसिल कार्यालयाकडे दिल्याचे वरील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत महसूल प्रशासनाने तात्काळ दखल मतदार पुनर्रचना पूर्ववत वा दुरुस्त करून न घेतल्यास मोठ्या प्रमाणातील तक्रारी जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे जाण्याचे संकेत आहेत.

याबाबत अनेक गावांतून तक्रारी आल्या असून उद्या (ता. ७) पर्यंत शिरूर तहसिल कार्यालयाकडे आणखी लेखी तक्रारी-आक्षेप नोंदविण्याची मुदत आहे. आलेल्या सर्व तक्रारींची गावनिहाय तलाठी, मंडलाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून त्या-त्या गावांची ग्रामपंचायत वार्डनिहाय मतदार अंतिम यादी दहा तारखेला प्रसिद्ध करणार आहोत.-लैला शेख, तहसीलदार

(संपादन : सागर डी. शेलार) 
      

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT