hadpasar.jpg 
पुणे

पाय घसरुन तरुणाचा जीव गेला तरी पुण्यातील 'त्या' सोसायटीतील पदाधिकाऱ्यांना जाग येईना

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : प्रथमा ( ए ) सोसायटीत सचिन तुकाराम गायकवाड ( वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) या तरूणाचा शनिवारी पाण्यात पाय घसरून डोक्यावर पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. मात्र अदयापही सोसायटीच्या पदाधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे रहिवाशांनी सोसायटीचे चेअरमन व पदाधिका-यांवर पोलिस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. इमारतीत व पार्कींगमध्ये जागोजागी साठलेला कचरा...तुंबलेल्या ड्रेनेज लाईन...मैलावाहिन्या तुंबल्याने पार्कींगमध्ये साठलेला मैला व त्याची दुर्गंधी...अस्वच्छतेमुळे डासांचे वाढते प्रमाण... अशी विदारक परिस्थिती रामटेकडी येथील प्रथमा ( ए ) बिल्डींगमध्ये आहे.

त्यामुळे आजारी पडणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण वाढले आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेतून ही इमारत बांधली आहे. याबाबत रहिवाशी कैलास कसबे म्हणाले, बिल्डरने सोसायटीकडे प्रत्येक सभासदाच्या नावे २० हजाराची ठेव ठेवली आहे. तसेच दर महिन्याला आम्ही मेंन्टेन्स भरतो. इमारतीवर चार मोबाईलचे टॅावर असून त्याचे सोसायटीला भाडे मिळते. मात्र सोसायटीच्या संचालकांकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. त्यातूनच सोसायटीत पाय घसरून सचिनचा मृत्यू झाला. त्यामुळे सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाविरोधात आम्ही रहिवाशी मिळून पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहोत.

अजय साळुंखे म्हणाले, सोसायटीत मैलापाणी वाहून नेणारी वाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे सर्व मैला पार्कींगमध्ये साचला आहे. त्यात आळ्या देखील झाल्या आहेत. नाकाला रूमाल बांधूनच याठिकाणाहून जावे लागते. याबाबत अनेकदा चेअरमनकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
अनिल देडे म्हणाले, आमच्या सोसायटीत १७६ सदनिका आहेत. सोसायटीतील सांडपाणी वाहून नेणा-या वाहिन्या तुंबलेल्या आहेत. हे पाणी पार्कींगमध्ये पडते. त्यामुळे शेवाळे साठलेले आहे. त्यावरून अनेक रहिवाशी पाय घसरून पडतात. त्यातूनच सचिनचा बळी गेला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोसायटीच्या चेअरमनकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीही उपाययोजना होत नाही. इमारतीची देखभाल व दुरूस्ती नियमितपणे केली जात नाही. त्यामुळे सोसायटीतील तरूणच अनेकदा सोसायटीची स्वच्छता करतात. 
डॅा. किशोर शहाणे व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक दत्ता कांबळे यांनी देखील सोसायटीची पहाणी केली व सचिनच्या मृत्यूप्रकरणी सोसायटींच्या चेअरमन व संचालकांन विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सकाळशी बोलताना सांगितले.

याबाबत सोसायटीचे चेअरमन काशिनाथ कुचेकर म्हणाले, सोसायटीतील सुमारे १२५ जण मेंन्टेनंस भरत नाहीत. रहिवाशी इमारतीमधील सुविधांचा योग्य रितीने वापरत नाही. त्यामुळे अनेकदा देखभाल व दुरूस्ती केल्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. नागरिकांनी सर्व सुविधा आपल्यासाठी आहेत, असे समजून त्याचा वापर करायला हवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT