waste problem in Katraj Ghat stinks at the entrance of South Pune 
पुणे

कात्रज घाटातून प्रवास करताय तर नाकाला लावावा लागेल रुमाल

सकाळवृत्तसेवा

कात्रज (ता. ०६) : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज घाटात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. कात्रज घाटातून प्रवास करावयाचा असल्यास नाकाला रुमाल लावण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत सकाळने सातत्याने वृत्त देऊनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. त्यामुळे कात्रज घाटातील कचऱ्याचा प्रश्न कधी सुटणार आणि दक्षिण पुण्याच्या प्रवेशद्वारावार दुर्गंधीने होणारे स्वागत कधी थांबणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळमध्ये कात्रज घाटाला कचऱ्याचा विळखा या मथळ्याखाली बातमी छापून आल्यानंतर कचऱ्याला अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली होती. ज्या निसर्गरम्य कात्रज घाटातून पुणेकर बाहेर पडतात तो कात्रज घाट बेजबाबदार नागरिकांमुळे कचराकुंडी बनला आहे. कात्रज घाटातून बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्यांने सकाळमधून यावर प्रकाश टाकूनही घाटातील कचऱ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे घाटात कचऱ्याचे साम्राज्य आणखीनच वाढत आहे.

काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज

शहरातून काही लोक गोणी आणि पोत्यामध्ये कचरा भरून आणून या ठिकाणी टाकत असल्याचे चित्र आहे. घाटालगच्या भागातून रात्रीच्यावेळी हा कचरा टाकला जातो. रात्रीच्यावेळी नागरिक कचरा टाकत असल्याने हा कचरा कोण टाकत आहे हे लक्षात येत नसून त्यासाठी ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही बसवण्याची मागणीही यापूर्वी करण्यात आली आहे. घरांमधील कचरा, बांधकामाचा राडारोडा आणि थर्माकॉलसारखा औद्योगिक कचरा, रुग्णालयातील मेडिकल वेस्टेजही मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे बाजूला पडल्याचे दिसते. कचऱ्यांमुळे डुकरांचा वावरही वाढला असून त्यांच्या अचानकपणे रस्त्यांवर येण्यामुळे दुचाकी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चारचाकी वाहनांसमोर आल्याने या प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

घाट परिसरात कचरा होण्यास भिलारेवाडी ग्रामपंचयातीने केलेले दुर्लक्ष आहे. यासाठी भिलारेवाडी ग्रामपंचायत सर्वस्वी जबाबदार आहे. ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्ही बसविण्यास सहमती दर्शविली होती. परंतु, ते कामही झाले नाही - हेमंत चौगुले, अभियंता बांधकाम विभाग.

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

''सीसीटीव्ही बसविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. तसेच, भिलारेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कचरा साफ करणार आहोत''
- विक्रम भिलारे, उपसरपंच भिलारेवाडी

''शहरातील दवाखान्यातील मेडिकल वेस्टेज आणि घरगुती कचरा लोक या भागात आणून टाकत आहेत. त्यामुळे पुण्याच्या दक्षिण प्रवेशद्वारावर दुर्गंधीने असे स्वागत होणे हे दुर्देवी आहे''
- महेश मांगडे, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT