पुणे

आयटी पार्क, ऑटो हबवर ‘वॉच’

अवधूत कुलकर्णी

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाने या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 

अशी आहे सद्यःस्थिती  
हिंजवडी आयटी पार्क आणि तळेगाव, चाकण परिसरात वाहतुकीची समस्या मोठी आहे. पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे या भागात नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे कठीण होत आहे. सीसीटीव्ही बसविल्यानंतर या भागातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या तिन्ही ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात बदल केले आहेत. मात्र, तरीदेखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सीसीटीव्ही बसविल्यानंतर या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्‍य होणार आहे. महापालिकेच्या हद्दीबाहेरील सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च गृहविभागातर्फे करण्यात येणार आहे.

शहरातही ४५० ठिकाणी कॅमेरे 
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर चहूबाजूंनी सुरक्षित करण्यासाठी प्रमुख ४५० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील यादी पोलिस आयुक्‍तालयाकडून महापालिकेला मिळालेली आहे. सीसीटीव्ही खरेदीसाठीची निविदा ३१ जानेवारी रोजी खुली करण्यात येणार आहे. ज्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत, अशा शहरातील प्रमुख चौकांची यादी पोलिस आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे. सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे दोन नियंत्रण कक्ष करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालयामध्ये आणि दुसरा कक्ष स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये राहणार असल्याचे महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.

सीसीटीव्हीचे फायदे
  वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर नजर ठेवता येईल
  शहरातील प्रत्येक चौकाकडे लक्ष ठेवणे होणार शक्‍य
  अनुचित प्रकार घडल्यास त्याचे फुटेज पोलिसांना सहज होणार उपलब्ध

तळेगाव, हिंजवडी, चाकण परिसरातही पिंपरी- चिंचवडच्या धर्तीवर सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरावर नजर ठेवणे शक्‍य होणार आहे. सीसीटीव्ही नियंत्रणासाठी आवश्‍यक असणाऱ्या मनुष्यबळाची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे. 
- आर. के. पद्‌मनाभन,  पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड आयुक्तालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील ४० वर्ष जुनी इमारत कोसळली, अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT