Pune Viral Video Esakal
पुणे

Pune Viral Video: नोकरी सोडल्याचा आनंद साजरा करायला थेट ऑफिसमध्ये आणलं ढोलपथक; बॉससमोरच केला डान्स

Pune Man Quits Toxic Job: एका तरुणाने आपल्या 'टॉक्सिक जॉब'च्या शेवटच्या दिवशी असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ढोल ताशा वाजवणाऱ्यांना बोलावलं आणि बॉससमोर मित्रांसोबत नाचायला सुरूवात केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune Man Quits Toxic Job: बरेच लोक त्यांच्या नोकरीत नाखूष असूनही, आर्थिक कारणांमुळे, किंवा चांगल्या पर्यायांच्या अभावामुळे नोकरी सोडू शकत नाहीत. अशा स्थितीत पुण्यातील एका तरुणाने आपल्या 'टॉक्सिक नोकरीच्या शेवटच्या दिवशी असे काही केले की, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्याने नोकरीच्या शेवटच्या दिवशी ढोल वाजवत बॉससमोर डान्स देखील केला.

अनिकेत नावाचा हा तरुण तीन वर्षांपासून एका कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ न मिळाल्याने ते निराश झाले होते. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनिकेत आणि त्याचे मित्र ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहेत, तर त्याचा बॉस त्यांना रागाने "बाहेर जा" असे सांगत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनिकेतच्या मित्राने सांगितले की, तीन वर्षांत अनिकेतला त्याच्या बॉसकडून कोणताही सन्मान मिळाला नाही.

व्हिडिओ शेअर करताना त्याच्या मित्राने लिहिले, "मला वाटते की बरेच लोक याच्याशी संबंधित असतील. आजकाल टॉक्सिक वर्क कल्चर सर्वत्र दिसून येत आहे, जिथे आदर नसणे आणि हक्क नसणे सामान्य आहे. अनिकेत त्याच्या आयुष्यातील पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. मला आशा आहे की, अनिकेतची गोष्ट लोकांना प्रेरणा देईल."

काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

एका यूजरने लिहिले की, "मला माहित नाही का, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटले." दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, "या डान्समुळे मला एक वेगळेच समाधान मिळाले आहे."दुसऱ्या एका सोशल मिडीया युजरने लिहले, "माझ्या आयुष्यात मी पाहिलेली सर्वात सकारात्मक आणि उत्साहवर्धक व्यक्ती आहे तू ."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: १२ तास ट्रॅफिक जाम! मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्रभर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

Gokul Milk Politics : शौमिका महाडिकांनी कंबर कसली, डिबेंचर्सच्या मुद्दावरून ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा...

Latest Marathi News Live Update : महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली

आता आव्हान शहरी नक्षलवादाचं, ६१ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणावेळी फडणवीसांचं विधान

Lac Or Lakh: चेकवर 'Lakh' लिहावं की ‘Lac’? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT