chaskaman.gif
chaskaman.gif 
पुणे

हाताने चाक फिरवून सोडले कालव्यात पाणी 

सकाळवृत्तसेवा

चास : चासकमान धरणाच्या कालव्याच्या दरवाजाचे विद्युतीकरण रखडले आहे. हाताने फिरवण्याचे गेटचे चाक काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांना गेटच्या चाकामध्ये पाइप घालून महत्प्रयासाने शिरूरसाठी कालव्यात पाणी सोडावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात धरणातील पाणी कालव्यात सोडण्याची वेळ आल्यास पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट उघडणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

चासकमान धरणातून कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवाजे असून, लोखंडी चाक हाताने फिरवून उघडावे लागतात. सदर गेट स्वयंचलित करण्याची मागणी होत होती. जवळपास वीस वर्षांनी विद्युत मोटर बसविण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली व एप्रिल 2018 मध्ये कामही सुरू झाले. त्यासाठी या गेटच्या चाकांना वरच्या बाजूस विद्युत मोटर बसविण्यात आल्या तसेच गेटसाठी असलेली लोखंडी चाकेही काढून टाकण्यात आली व लवकरच ही स्वयंचलित यंत्रणा सुरू होईल, असे वाटत असताना काम बंद झाले. काढलेली लोखंडी चाके व खोलून ठेवलेली लोखंडी चाके धरण स्थळावर पडलेली आहेत. 

शिरूर तालुक्‍याची पाण्याची गरज पाहता कालव्यातून पाणी सोडण्यासाठी या गेटची व गेटच्या चाकाची गरज असताना फिरविण्यासाठी चाकच नसल्याने कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर गेटच्या वरील व्हीलमध्ये पाइप घालून पाणी सोडले. सध्या धरणात केवळ 7.30 टक्के पाणीसाठा असल्याने गेटचे चाक फिरवण्यास तसे सोपे गेले. परंतु, पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर व कालव्यातून पाणी सोडण्याची गरज भासल्यास पाण्याच्या दाबामुळे पाइपच्या साह्याने गेट उघडणे शक्‍य होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरवाजांचे विद्युतीकरण करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT