Water Crisis Sakal
पुणे

Water Crisis : उरुळी देवाची मधील विहिरी कोरड्या; पाणी पुरवठ्यात वाढ करावी; नागरिकांची मागणी

कडक उन्हाळा त पाण्याची कमतरता भासत असल्याने उरुळी देवाची मध्ये नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जाण्याची वेळ अली आहे.प्रशासनाने येथील पाणी पुरवठ्यात वाढ करावी,अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी : कडक उन्हाळा त पाण्याची कमतरता भासत असल्याने उरुळी देवाची मध्ये नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जाण्याची वेळ अली आहे.प्रशासनाने येथील पाणी पुरवठ्यात वाढ करावी,अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

वाढत्या उन्हामुळे येथील विहिरी कोरड्या पडण्यास सुरवात झाली आहे.याचा थेट परिणाम राहिवाश्यांवर पडत आहे.पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.गावचे पूर्ण शहरीकरण झालेले नाही, मात्र लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.संकुलाचे प्रमाण वाढल्याने कुपनलिकांचे चे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होऊन विहिरींनाही पाणी कमी पडू लागले आहे. पाण्याची भुजल पातळी केवळ खालावली नाही, तर पाणीच शिल्लक राहिलेच नाही असे म्हणावे लागेल.

पिण्याचे पाणी पालिका जरी टँकरने पुरवत असेल तरी वाढता उन्हाळा पाहता त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. वापराचे पाणीदेखील विकत घेण्याची वेळ येत आहे. यामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत होत आहे.गावात थोडीफार प्रमाणात शेती व्यावसाय आहे. विहिरींना पाणी नसल्याने शेती व्यावसाय धोक्यात आला आहे.असे रहिवाशी सचिन अडसूळ यांनी अंगीतले.

आकाश बहुले ( स्थानिक रहिवाशी उरुळी देवाची): उन्हाळ्याचे आणखी तीन महिने जायचे आहेत.आताच ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यापर्यंत नागरिकांचे हाल होणार आहेत.पाण्याची कमतरता जाणवत असल्याने मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर पालक त्यांना गावी पाठवण्याचे नियोजन करत आहे.गावाला दुष्काळी गाव म्हणून जाहीर करावे.

निखिल घरत( कनिष्ठ अभियंता हडपसर क्षेत्रीय कार्यालय): याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत.महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरण विभागाशी चर्चा सुरू आहे.ज्या भागात वाहिनीचे काम पूर्ण आहेत त्या भागात नवीन नालजोड देण्यासाठी चर्चा सुरू आहे.नवीन नालजोड केल्यास टँकरची संख्या न घटवता तेवढीच ठेऊन पुरवठा वाढवता येईल असे नियोजन आखत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलींसाठी फायद्याची बातमी! लेक लाडकी योजनेतून मुलींना मिळणार १ लाख एक हजार रुपये; सोलापूर जिल्ह्यात ९९९६ मुलींना लाभ; ‘या’ मुलींसाठी आहे योजना

Peanut Cookies Recipe: घरच्या घरी बनवा बिना ओव्हन शेंगदाणा बिस्किट्स, लहान मुले होतील आनंदी, लगेच नोट करा रेसिपी

आजचे राशिभविष्य - 30 ऑक्टोबर 2025

Women's World Cup 2025: भारत - ऑस्ट्रेलिया फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भिडणार! सेमीफायनल Live कुठे अन् किती वाजता पाहाणार?

अग्रलेख : ‘अवकाळी’ राजकारण

SCROLL FOR NEXT