water release on Mutha river in Khadakwasla dam pune
water release on Mutha river in Khadakwasla dam pune 
पुणे

Video : भिडे पूल पाण्याखाली; नदीपात्रातील रस्त्याने येऊ नका!

राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सोमवारी सायंकाळपासून मुठा नदीत पाणी सोडण्यास सुरवात झाली असून, आज (मंगळवार) सकाळी हा विसर्ग 13 हजार 981 क्युसेकने पाणी सोडण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील डेक्कनजवळील बाबा भिडे पुल व रस्ता पाण्याखाली गेला आहे. 

सोमवारी सायंकाळी पाच हजार 136 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. 

खडकवासला प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात सोमवारी दिवसभरात अर्धा अब्ज घनफूटने (टीएमसी) वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांपासून टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे येवा वाढला असून, शनिवारी (ता.२७) सायंकाळपर्यंत खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा १८.११ टीएमसी होता. तो सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २०.९७ टीएमसी (७१.९३ टक्‍के) झाला आहे. म्हणजेच गेल्या दोन दिवसांत पाणीसाठ्यात २.८६ टीएमसीने वाढ झाली आहे. या प्रकल्पातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासोबतच ग्रामीण भागात शेतीसाठी आवर्तन दिले जाते. 

भीमा खोऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ 
भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कळमोडी, आंद्रा धरण भरल्यानंतर आता चासकमान पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. वीर, भाटघर आणि नीरा देवधर धरणांतील साठ्यातही चांगली वाढ होत आहे; परंतु घोड, विसापूर, पिंपळगाव जोगे आणि नाझरे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या धरणांत अद्याप पुरेसा पाणीसाठा नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

VIDEO: बाप तसा लेक! गोविंदाच्या मुलाच्या जबरदस्त डान्स व्हायरल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT