mahametro
mahametro Sakal Media
पुणे

पुणे : नदीपात्रातील भराव काढा; जलसंपदा विभागाचे महामेट्रोला आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः मुठा नदीच्या पात्रात मेट्रो मार्गाचे खांब उभारण्यासाठी टाकण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात शहराच्या मध्यभागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन हा भराव तातडीने काढून टाकावा, असा आदेश जलसंपदा विभागाने एका पत्रान्वये महामेट्रोला दिला आहे. पावसाळा लक्षात घेऊन भराव काढण्याचे काम या पूर्वीच सुरू करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण महामेट्रोने रविवारी केले.

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यातंर्गत वनाज- रामवाडी आणि पिंपरी चिंचवड - स्वारगेट या मार्गांवर मेट्रो मार्गांसाठी खांब उभारण्यात येत आहे. तसेच डेक्कन जिमखाना, संगम पूल (प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ) आणि बंडगार्डन पूल येथेही नदीपात्रात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी खांब उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच त्यावर आता गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नदीपात्रात वाहनांची ये-जा सुरू आहे. ती सुलभ व्हावी, यासाठी तेथे भराव टाकण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावर स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर पुतळा ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंत मेट्रो मार्ग मुठा नदीच्या पात्रातून जात आहे. हा सुमारे ६०० मीटरचा मार्ग नदीतून जात असून त्यावर तीन स्थानके होणार आहे. तसेच संगमपूल येथे नदीपात्र ओलांडून मेट्रो मार्ग येरवड्याच्या दिशेने जात आहे. तसेच बंडगार्डन येथेही मुळा - मुठा नदीचे पात्र ओलांडून मेट्रो मार्ग रामवाडीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे तेथेही भराव टाकण्यात आला आहे. राज्यात पावसाचे आगमन दरवर्षी ७ जून रोजी होते. हे लक्षात घेऊन नदीपात्रातील भराव काढून टाकण्याची महामेट्रोला आदेश द्यावा, अशी मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी जलसंपदाविभागाकडे केली होती. त्याची दखल घेऊन जलसंपदा विभागाने पाहणी केली. त्यानंतर पुणे पाटबंधारे मंडळातील अक्षीक्षक अभियंता सं. द. चोपडे १७ मे रोजी महामेट्रोला पत्र पाठविले. त्यात नदीपात्रातील भराव तातडीने काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच वेळेत हा भराव काढला नाही आणि या बाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल झाल्यास, त्याला जलसंपदा विभाग जबाबदार नसेल, असेही बजावण्यात आले आहे.

डेक्कन जिमखाना, संगम पूल आणि बंडगार्डन येथील नदीपात्रातील भराव काढून टाकण्याचे काम या पूर्वीच सुरू झाले आहे. सुमारे ७०-८० टक्के भराव काढून टाकण्यात आला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी उर्वरित भरावही काढला जाईल. या बाबत जलसंपदा विभागाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महामेट्रोकडून सुरू आहे.

-हेमंत सोनवणे (महासंचालक, महामेट्रो)

मुळात मेट्रोच्या खांबांमुळे नदीची पूररेषा पाच फुटांनी वर सरकली आहे, असे सेंट्रल वॉटर ॲंड पॉवर रिसर्च स्टेशनच्या (सीडब्ल्यूपीआरएस) अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यात आता भरावामुळे मुळा-मुठा नदीचे पात्र आकुंचित झाले आहे. या भरावामुळे पाण्याचा फुगवटा १८३ फुटांनी वाढण्याची शक्यता असून त्यामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, कामगार पुतळा आदी मध्य भागात पावसाळ्यात पूर येऊ शकतो. त्यामुळे हा भराव महामेट्रोने तातडीने काढण्याची गरज आहे.

-सारंग यादवाडकर (पर्यावरण अभ्यासक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT