Water Shortage
Water Shortage 
पुणे

हिंगणे, आनंदनगरमध्ये घशाला कोरडच

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता - शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे भरली असूनसुद्धा सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे. 

हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग भागात पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, तो सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आनंदनगर, माणिकबाग, रामनगर, कुदळेबाग, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलनगर, दामोदरनगर, तुकाईनगर, हिंगणे, विठ्ठलवाडी, तरडे कॉलनी, खोराड वस्ती, आनंदनगर पूर्व आणि आनंदनगर पश्‍चिम भागात पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून होत आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहराला धरणातून दररोज साडेतेराशे एमएलडी पाणी दिले जाते. त्यातील २१० एमएलडी पाणी वडगाव जलशुद्धीकरण केंद्रास दिले जाते. या भागाला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रामार्फत सिंहगड रस्ता भागातील हिंगणे, आनंदनगर-सनसिटी रस्ता, माणिकबाग, वडगाव, धायरी, कात्रज, कोंढवा या भागात पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रांतर्गत सात भाग येतात. त्यातील प्रत्येक भाग आठवड्यातून बंद ठेवल्यास पाणीपुरवठा सुरळीत होतो. नागरी वस्ती वाढल्यामुळे तेथे नवीन पाण्याच्या टाक्‍या उभारण्याची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

एकीकडे धरणे भरली आहेत. पुणे शहराला वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याचा आपण विसर्ग केला आहे; मात्र दुसरीकडे नागरिकांना नियमित पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जात नाही. 
- शर्वरी कुलकर्णी, रहिवासी, सुंदर सहवास सोसायटी

एकीकडे २४ तास पाणीपुरवठ्याची घोषणा केली जाते; मात्र दुसरीकडे पाणी नाही. आमच्या भागात दर मंगळवारी पाणी नाही. धरणे भरली असूनही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही? नागरिकांना याचे नेमके कारण दिले जात नाही. नेमकी माहिती नागरिकांना दिल्यास तशा पद्धतीने सोय करता येते. 
- रवींद्र चौधरी, रहिवासी, आनंदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

Canada: हरदीप सिंग निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाची मोठी कारवाई; तीन भारतीयांना अटक

SCROLL FOR NEXT