dimbhe
dimbhe 
पुणे

डिंभे धरणाच्या साठ्यात एकाच दिवसात साडेतीन टक्के वाढ 

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे डिंभे धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूस बुब्रा व घोड नदी दुथडी भरून वाहत आहेत. भात खाचरे तुडुंब भरली असून, भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. डिंभे धरणात 6.56 टीएमसी (52.53 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

आंबेगाव तालुक्यात जूनपासून जोरदार पावसाची आवश्‍यकता होती. परंतु, जून ते 10 ऑगस्टपर्यंत पाऊस रिमझिम स्वरूपात पडत होता. धरणात 1 जूनला 24 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. परंतु, जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. पेरणीयोग्य पाऊस झाला. पण, पाणीसाठा झाला नव्हता. आदिवासी भागात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने धरणसाठ्यात हळूहळू वाढ होऊन ती 50 टक्‍क्‍यांच्या पुढे गेली आहे. मागील वर्षात योग्य ते नियोजन केल्याने पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या 24 तासात धरणक्षेत्रात 21 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पाणीसाठा 3.47 टक्क्यांनी वाढला आहे. 

भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात 24 तास मुसळधार पाऊस पडत आहे. बुब्रा व घोड नदीला पूर आला आहे. धरणात वेगाने पाणी येत असल्याने पाण्यात वाढ होत आहे. आतापर्यंत धरणक्षेत्रात एकूण 506 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तालुक्‍याच्या मध्य व पूर्व भागातही जोरदार पाऊस पडत आहे. घोडेगाव येथे 20 मिलिमीटर, मंचर येथे 4 मिलिमीटर, कळंब येथे  3 मिलिमीटर, पारगाव येथे  3 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. 

भात लावणी 5 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रापैकी 4500 हजार हेक्‍टर क्षेत्रात झाली आहे. भात लावणीची कामे आठ दिवसांत पूर्ण होतील ,असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT