Water Tanker
Water Tanker sakal
पुणे

Water Tanker Lobby : पुणेकर उपाशी, टँकर लॉबी तुपाशी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - धरणातील पाणी कमी झाले म्हणून दर गुरुवारी शहराचा पाणी बंद ठेवून कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. तसेच यावेळी टँकर भरणा केंद्र देखील बंद असणार असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, प्रत्यक्षात पुणेकरांचे पाणी बंद करून टँकरवाल्यांसाठी टँकर भरणा केंद्र सुरूच ठेवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे टँकर लॉबीसाठी महापालिका पुणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप केला जात आहे.

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर गुरुवारी पाणी बंद असले तरीही कमी दाबाने पाणी येणे, अपुरे पाणी येणे याचा त्रास पुढचे दोन तीन दिवस सहन करावा लागत आहे. महापालिकेचे मोफत टँकर मागविले तरी ते लवकर मिळत नाहीत अशीच अवस्था शहरात आहे. दर गुरुवारी शहराच्या पाणी पुरवठ्यासह टँकर भरणा केंद्र बंद ठेवले जातील असे सांगितले होते.

पण पद्मावती येथील टँकर भरणा केंद्र गुरुवारी दिवसभर सुरू होते. तेथे सुमारे २० ते ३० टँकरची लांबच्या लांब रांग लागली होती. तसेच टँकर भरणा केंद्रावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे टँकर रस्त्यावर उभे करून भरले जात होते. एकीकडे पुणेकरांना पाणी न देता टँकरसाठी पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले, ‘दर गुरुवारी संपूर्ण पुणे शहरात पाणी बंद असते. पण हा नियम टँकरला यांना लागू नाही का? प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवून हे भरलेले टँकर कुठे रिकामे केले जातात याचे उत्तर महापालिकेने द्यावे. पाणी पुरवठा विभागाने टँकर माफियांना मोकळीक दिल्याचे चित्र शहरात असून, यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: नागपुरात आणखी एक कार अपघात! अल्पवयीन कार चालकाने पाच जणांना उडवलं, अल्पवयीन कारचालकासह...

कोरोनानंतर आणखी एका गूढ आजाराने डोकेदुखी वाढली! ही लक्षणे दिसली तर ४८ तासात रुग्णाचा मृत्यू निश्चित

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

Rudraprayag Accident: एक डुलकी अन् क्षणात बस कोसळली दरीत...१४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT