चिंचवडगाव - फत्तेचंद जैन विद्यालयाच्या भिंतीलगत घरगुती नळजोड गुरुवारी सकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
चिंचवडगाव - फत्तेचंद जैन विद्यालयाच्या भिंतीलगत घरगुती नळजोड गुरुवारी सकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. 
पुणे

खोदाईत जलवाहिन्यांवर घाव

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोट्यवधींच्या कामांच्या निविदा निघतात, नियम अटी घालून ठेके दिले जातात. ठेका मिळाला की ठेकेदार गायब, मुकादम बेपत्ता...आणि मजुरांकडून सुरू होते दे दणादण खोदाई. पटापट काम संपविण्याच्या नादात त्यांच्या कुदळ थेट जलवाहिनीवर पडतात व हजारो लिटर पाणी कारंजाप्रमाणे उडत राहते. महापालिकेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी येईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे अगोदरच एक दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे त्रासलेल्या जनतेच्या वैतागात आणखी भर पडते. गेल्या पंधरा दिवसात असे आठ प्रकार घडले आहेत.

पंधरा दिवसापासून शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची वेळ वाढवली आहे. परिणामी पाण्याचा दाब वाढून वाहिन्या फुटण्याचे प्रकार दररोज होत आहेत. अनेक वाहिन्या जुन्या असल्याने गंजूनही फुटत आहेत. सध्याचे सहा फूट रुंद रस्ते १२ ते २४ फूट केले जात आहेत. मात्र, खोदाईवेळी महापालिकेकडून या वाहिन्या कोठे आहेत, याची माहिती ठेकेदाराला दिली जात नाही. याचाच परिणाम म्हणून ज्या ठिकाणी अशी कामे सुरू असलेल्या ठिकाणी वाहिन्या फुटत आहेत. 

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ‘‘खोदकाम करताना तेथे जलवाहिनी आहे का, याची चाचपणी ठेकेदाराने करणे आवश्‍यक आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT