Naidu Hospital 
पुणे

आम्ही कोरोनामुक्त अन् निरोगी! नायडू रुग्णालयातून घरी सोडलेल्या दांपत्यांचा अभिप्राय

सकाळवृत्तसेवा

पुणे - आम्ही कोरोनामुक्त झालो. निरोगी होऊन आता घरी जात आहोत. इतर रुग्णही कोरोनामुक्त होतील, असा विश्वास कोरोनापासून मुक्त झालेला दांपत्यांनी बुधवारी व्यक्त केला. या  कोरोनामुक्त या दांपत्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाडव्याला हे दांपत्य नवी गुढी उभारण्यासाठी खडखडीत बरे होऊन घरी गेले. गेले 16 दिवस ते महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत होते. तेथून बाहेर पडताना नायडू रुग्णालायातील अभिप्रायात हा विश्वास व्यक्त केला.

सिंहगड रस्त्यावरील दांपत्य आपल्या सहजीवनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी दुबई सहलीला गेला होते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग त्यांना तेथे झाला. होळीच्या दिवशी, 9 मार्चला त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ते येथील विलगीकरण कक्षात उपचार घेत होते. 

“आम्ही वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंत पालन केले. आता आमच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आम्ही कोरोनामुक्त झालो आहोत. निरोगी झालो आहोत. कोरोनाचा संसर्ग झालेले इतर रुग्णही निश्चित बरे होतील. ते निरोगी होऊन घरी जातील. याची खात्री आहे,” असेही त्यांनी अभियाप्रात म्हटले आहे.

वैद्यकीय सल्ल्याचे तंतोतंप पालन केल्यास कोरोनामुक्त होऊ शकतो. तसेच, पतंप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सरकारी यंत्रणा यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे वागल्यास आपला देशही कोरोनामुक्त होईल, अशी भावनाही त्यांनी यात व्यक्त केली आहे. 

आरोग्य सेवकांचे आभार
नायडू रुग्णालयातील सर्व वैद्यकीय तज्ज्ञ, परिचारिका, कर्मचारी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, तज्ज्ञ डॅक्टर यांचे मनःपूर्वक आभारही या दांपत्याने मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT